Wardha News : एक दोन नव्हे 5 वेळा त्याने डोक्यात घातला दगड, भर रस्त्यात घेतला जीव, वर्धा हादरलं
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Wardha News : वर्धा जिल्ह्यात भरदिवसा घडलेल्या एका हत्येच्या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपींना थेट घटनास्थळावरुन उचललं आहे.
वर्धा, (नरेंद्र मते, प्रतिनिधी) : देवळी येथे घडलेल्या एका घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सोनेगाव मार्गावर दिवसाढवळ्या भररस्त्यात एका व्यक्तीची दगड घालून हत्या करण्यात आली. या घटनेत 2 महिलाही जखमी झाल्या आहेत. आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरुनच ताब्यात घेतलं. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
विनोद डोमाजी भरणे राहणार सोनेगाव (आबाजी) असं हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर करण मोहिते असं आरोपीचं नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान, हत्येचं कारण अस्पष्ट आहे. घटनेनंतर स्थानिकांनी आरोपीला ताब्यात घेऊन मारहाण करत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. सुरक्षेच्या कारणातून आरोपीला वर्धा शहर पोलीस स्टेशनला नेण्यात आलं आहे. तर 2 जखमी महिलांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
view commentsLocation :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
June 24, 2024 7:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
Wardha News : एक दोन नव्हे 5 वेळा त्याने डोक्यात घातला दगड, भर रस्त्यात घेतला जीव, वर्धा हादरलं


