Wardha News : डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूरं राहिलं! इमारतीवरुन उडी मारुन MBBS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या

Last Updated:

Wardha News : वर्धा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूरं राहिलं!
डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूरं राहिलं!
वर्धा, (नरेंद्र मते, प्रतिनिधी) : वर्ध्यातून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. वर्ध्याच्या सावंगी (मेघे) येथील एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीने आत्महत्या केली. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पूजा रजानी, असं मृत मुलीचं नाव आहे. पूजाने स्वःला का संपवलं याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यासह सावंगी पोलीस रूग्णालयात दाखल झाले आहे. विद्यार्थ्यांची कॉलेज प्रशासनासोबत चर्चा सुरू आहे.
नातेवाईकांचा महाविद्यालय प्रशासनावर आरोप
वर्ध्याच्या सावंगी (मेघे) येथील एमबीबीएस द्वितीय वर्षाच्या विद्यार्थीनीने मेडिकल कॉलेजच्या आवारातील बिल्डिंगच्या टेरेसवरून उडी घेत आत्महत्या केली. यामुळे मेडिकलच्या क्षेत्रात खळबळ निर्माण झाली आहे. मेडिकल कॉलेज प्रशासनाने विद्यार्थीनीने मानसिक तणावातून आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे. तर विद्यार्थीनीच्या आई वडिलांनी व्यवस्थानावर ताशेरे ओढत फी भरल्याशिवाय परीक्षेला बसता येणार नाही, असे कारण पुढे करून विद्यार्थीनीला परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा आरोप मुलीच्या आई आणि मामा यांनी केला आहे.
advertisement
साताऱ्यात डॉक्टरची आत्महत्या
कराड तालुक्यातील ओंड येथे डॉ. हेमंत रेळेकर आणि त्यांच्या पत्नी डॉ. दिपा रेळेकर हे अनेक वर्षांपासून आपला वैद्यकीय व्यवसाय करत होते. ओंडोशी रस्त्यावर त्यांचे रेळेकर हॉस्पिटल आहे. तर पहिल्या मजल्यावर ते आई, पत्नी, मुलगा, मुलगी असे परिवारासह रहात होते. घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, बुधवारी (1 ऑगस्ट) सकाळी डॉ. हेमंत रेळेकर यांनी आवरुन नेहमीप्रमाणे आपल्या दवाखान्यात आले. त्यानंतर बराच वेळ झाला ते घरी पतरले नाही. हेमंत रेळेकर घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी दवाखान्यात जाऊन पाहिलं असता त्यांना एका खोलीत डॉ. हेमंत रेळेकर यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला.
advertisement
कुटुंबियांचा आरोप काय?
कराड तालुक्यातील ओंड येथे ही घटना घडली आहे. डॉक्टर हेमंत रेळेकर यांच्या फायनान्स कंपनी आणि‌ बँका यांचे कर्ज होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी फायनन्स कंपनी आणि बंकेकडून सारथा तगादा लावला जात होता. अखेर या सर्वांचा त्रास अनावर झाल्याने डॉ. हेमंत रेळेकर यांनी रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली.
advertisement
view comments
मराठी बातम्या/ वर्धा/
Wardha News : डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूरं राहिलं! इमारतीवरुन उडी मारुन MBBS च्या विद्यार्थिनीची आत्महत्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement