Weather Update: थंडी विसरा, 10 नोव्हेंबरपर्यंत छत्रीच ठेवा, हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी दिला अलर्ट
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Weather Update: नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात IMD च्या अंदाजानुसार अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान, थंडी लांबणीवर; कोकण, मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे यलो अलर्ट जारी.
दिवाळी संपली तुळशीचं लग्न लागलं तरी पावसाचं जायचं काही अजून ठरत नाही, नोव्हेंबरच्या पहिल्याच आठड्यात पावसाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. अचानक येणाऱ्या पावसामुळे कापलेलं पिक किंवा कापणी सुरू असलेल्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. याच पावसामुळे थंडी लांबणीवर गेली आहे तर ढगाळ वातावरणामुळे घामाच्या धारा वाहू लागल्या आहेत. अवकाळी पाऊस 10 नोव्हेंबरपर्यंत मुक्काम करणार आहे. त्यानंतर मात्र पावसाचा जोर कमी होईल.
का पडतोय पाऊस IMD ने दिलं उत्तर
सायक्लोनिक सर्क्युलेशन उत्तर पश्चिम दिशेकडून येत आहे. जे 4 आणि 5 नोव्हेंबर रोजी प्रभावित करणार आहे. कोकण आणि गोवा समुद्रकिनाऱ्यावर पावसाची नोंद करण्यात आली आहे. म्यानमारजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. पश्चिम बंगालच्या खाडीत तो असल्याने भारताच्या दिशेनं वारे पुढे सरकतात का ते पाहाणं महत्त्वाचं ठरेल. दुसरं महत्त्वाचं म्हणजे गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
advertisement
पुढचे 48 तास कसं राहील हवामान?
आज महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार आहे. महाराष्ट्राशेजारील राज्यांमध्ये मात्र आज वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 5 आणि 6 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल. कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्रात आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलक्या ते मध्य स्वरुपाचा पाऊस होणार आहे. विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
कोकणात काय स्थिती?
कोकण विभागातील मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसण्याचा अंदाज आहे. मुंबईत कमाल तापमान 32 अंश तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस नोंदवले जाण्याचा अंदाज आहे.पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि घाटमाथा परिसरात विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या सरींचा अंदाज आहे. पुण्यातील कमाल तापमान सुमारे 29 अंश आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याची शक्यता आहे.
advertisement
पुढचे सातही दिवस पावसाचे
view commentsडॉ. सुप्रित कुमार हवामान तज्ज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ आणि ६ ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 7 ऑक्टोबर रोजी पुन्हा कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस बरसणार आहे. अवकाळी पावसामुळे थंडी लांबणीवर गेली आहे. दुपारी मे महिन्यासारखं हवामान आणि पहाटे आणि संध्याकाळी अचानक धो-धो कोसळणारा पाऊस यामुळे वातावरण विचित्र झालं आहे. 8 ते १० नोव्हेंबर दरम्यान हलक्या स्वरुपाचा पाऊस राहणार आहे. त्यानंतर अवकाळी पावसाचा जोर कमी होईल अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 04, 2025 7:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update: थंडी विसरा, 10 नोव्हेंबरपर्यंत छत्रीच ठेवा, हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी दिला अलर्ट


