Weather Report: संक्रांतीनंतर हे कसलं संकट? रात्री हुडहुडी अन् संध्याकाळी रिमझिम, जानेवारीत अचानक का पडतोय पाऊस?

Last Updated:

बीड आणि धारूरमध्ये संक्रांतीनंतर अवकाळी पावसामुळे नागरिक आणि शेतकरी चिंतेत आहेत. बंगालच्या उपसागरातील हवामान बदलामुळे तापमान घटणार असून रब्बी पिकांना फटका बसू शकतो.

News18
News18
जानेवारी म्हटलं की कडाक्याची थंडी आणि निरभ्र आकाश डोळ्यासमोर येते. साधारण संक्रांत झाली की थंडीचा जोर ओसरतो. हाडं बोचणारी थंडी कमी होते. मात्र, यावेळी संक्रांतीनंतर नवीन संकट आलं आहे. यंदा बीड जिल्ह्यात हवामानाने भलतीच कूस बदलली. बुधवारी सायंकाळी बीड आणि धारूर परिसरात अचानक पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने नागरिक अवाक झाले. संक्रांतीनंतर ऊन वाढण्याऐवजी हे पावसाचं कसलं संकट? असा प्रश्न आता सर्वसामान्यांना पडला आहे.
नेमका का पडतोय पाऊस?
हवामान तज्ज्ञांच्या मते, बंगालच्या उपसागरात तामिळनाडूच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तिथे चक्राकार वारे वाहत आहेत. या हवामान प्रणालीचा अप्रत्यक्ष फटका मराठवाड्याला बसत आहे. दक्षिणेकडून येणाऱ्या ढगांमुळे बीडसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण निर्माण झाले असून त्यामुळेच ही अवकाळी रिमझिम सुरू आहे. पुणे जिल्ह्यातही काही भागांमध्ये 10-15 मिनिटं रिमझिम सरी बरसल्या.
advertisement
आता थंडीचा कडाका वाढणार!
मागच्या 48 तासात तापमान १७ अंशांवर होते, त्यामुळे थंडीचा प्रभाव कमी जाणवत होता. मात्र, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १४ जानेवारी म्हणजेच मकरसंक्रांतीपासून हे ढगाळ वातावरण निवळायला सुरुवात होईल. त्यानंतर उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे १५ ते १८ जानेवारी दरम्यान थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. तापमान थेट १२ अंशांच्या खाली जाण्याची शक्यता असल्याने रात्रीची 'हुडहुडी' वाढणार आहे.
advertisement
शेतकरी चिंतेत: रब्बी पिकांना फटका बसणार?
पावसामुळे धारूर परिसरातील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला आणि रब्बी पिकांना थोडी ओल मिळाली असली, तरी येणाऱ्या थंडीचा कडाका शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे. तापमान घटल्याने हरभरा आणि गहू या पिकांवर मोठ्या प्रमाणात दव पडण्याची शक्यता आहे. यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे. कोकणातही ढगाळ वातावरण असल्याने आलेल्या आंबा काजूचा मोहोर गळून पडला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Report: संक्रांतीनंतर हे कसलं संकट? रात्री हुडहुडी अन् संध्याकाळी रिमझिम, जानेवारीत अचानक का पडतोय पाऊस?
Next Article
advertisement
BMC Election Voting Marker : मतदानाची शाई एका मिनिटात गायब! मुंबई, कल्याण ते पुणे सगळीकडे गोंधळ, उमेदवार धास्तावले, नेमका प्रकार काय?
मतदानाची शाई एका मिनिटात गायब! मुंबई, कल्याण ते पुणे सगळीकडे गोंधळ, उमेदवार धास्
  • मतदान करणाऱ्या मतदारांच्या बोटांवर लावण्यात येणारी शाई पुसली जात असल्याचा प्रकार

  • मुंबई, ठाणे ते पुणे, छत्रपती संभाजीनगरमध्येही मार्करच्या शाईने घोळ घातला

  • शाई पुसली जात असल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.

View All
advertisement