80 लाख EPS पेन्शनर्सच्या पैशांवर सरकारचा डल्ला, संतप्त जेष्ठ नागरिकांचा आरोप, 'हा' प्रश्न कधी सुटणार? 

Last Updated:

Karad News : 'कर्मचाऱ्यांनी आयुष्याची कमाई जमा करूनही, सरकार पेन्शन देत नाही', असा संतप्त आरोप करत ईपीएस पेन्शनर्सनी केंद्र सरकारवर...

Karad News
Karad News
Karad News : 'कर्मचाऱ्यांनी आयुष्याची कमाई जमा करूनही, सरकार पेन्शन देत नाही', असा संतप्त आरोप करत ईपीएस पेन्शनर्सनी केंद्र सरकारवर आपला संताप व्यक्त केला आहे. गेली अनेक वर्षे आंदोलने करूनही पेन्शनचा प्रश्न सुटत नसल्याने 80 लाख ज्येष्ठ नागरिक निराश झाले आहेत.
पेन्शनची वाट बघत अनेक पेन्शनर्सनी जगाचा निरोप घेतला आहे, मात्र त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्या फंडातील रक्कम वारसांना मिळत नाही. पेन्शनर्सच्या म्हणण्यानुसार, गेल्या 4 वर्षांत सरकारने तब्बल 1 लाख 16 हजार 64 कोटी रुपयांची रक्कम हडपली आहे. ही रक्कम पाहिली तर, सरकारला पेन्शनर्सची मागणी पूर्ण करणे सहज शक्य आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.
advertisement
'आमची मागणी अवाजवी नाही!'
पेन्शनर्सची प्रमुख मागणी आहे की, त्यांना दरमहा 7500 रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता (मेडिकल) मिळावा. हे सर्व पेन्शनर 65 ते 80 वयोगटातील ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना या पैशांची नितांत गरज आहे. गेली 10 ते 15 वर्षे आंदोलने करूनही आणि सरकारकडे पैसे शिल्लक असूनही, सरकार फक्त आश्वासने देत आहे, पण कोणताही ठोस निर्णय घेत नाही. हा सरकारचा नाकर्तेपणा, आडमुठेपणा की वेळ काढूपणा आहे, असा संतप्त प्रश्न पेन्शनर्स विचारत आहेत.
advertisement
दरवर्षी देशात अंदाजे 1 लाख पेन्शनर्सचा मृत्यू होतो आणि त्यांच्या फंडातील पैसे वारसांना मिळत नाहीत. सरकारने या रकमेवरही डल्ला मारला असल्याचा आरोप पेन्शनर्स करत आहेत. त्यामुळे, या वर्षी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पेन्शनर्सनी गणपती बाप्पांकडे साकडे घातले आहे की, 'सरकारला सद्बुद्धी दे आणि आमच्या पेन्शनचा प्रश्न लवकर सोडव'.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
80 लाख EPS पेन्शनर्सच्या पैशांवर सरकारचा डल्ला, संतप्त जेष्ठ नागरिकांचा आरोप, 'हा' प्रश्न कधी सुटणार? 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement