'बापाला फाशी द्या' म्हणणाऱ्या आंचलबद्दल उलट सुलट कमेंट का करताय लोकं? ही कोणती मानसिकता?

Last Updated:

वडिलांनी आणि भावाने आपल्या प्रियकराला मारलं, त्यामुळे मुलींनी देखील अशी मागणी केली आहे की, माझ्या वडिलांना आणि भावाला देखील मारून टाका. यामुळे सध्याला या मुलीवरती देखील मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.

+
बापाला फाशी द्या

'बापाला फाशी द्या' म्हणणाऱ्या आंचलबद्दल उलट सुलट कमेंट का करताय लोकं? ही कोणती मानसिकता?

छत्रपती संभाजीनगर: अलीकडेच नांदेडमध्ये एक गंभीर प्रकरण घडलं, यामध्ये मुलीने दुसऱ्या जातीतल्या मुलावर प्रेम केलं म्हणून तिच्या वडिलांनी आणि भावाने तिच्या प्रियकराला ठार मारलंय. संभाजीनगर शहरात देखील असंच एक प्रकरण घडलं होतं. यामध्ये देखील आंचलने दुसऱ्या जातीमध्ये विवाह केल्यामुळे तिच्या वडिलांनी आणि भावाने तिच्या नवऱ्याचा खून केला होता. या दोन्ही प्रकरणांमध्ये दोन्हीही मुलींचे वय हे 18 वर्षापेक्षा जास्त होते. तरी देखील त्यांना या सर्व गोष्टींना सामोरे जावे लागले.
नांदेड मधल्या प्रकरणांमध्ये वडिलांनी आणि भावाने सक्षमला (प्रियकर) मारलं, त्यामुळे मुलींनी देखील अशी मागणी केली आहे की, माझ्या वडिलांना आणि भावाला देखील मारून टाका. यामुळे सध्याला या मुलीवरती देखील मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. वडिलांना आणि भावाला मारण्यापेक्षा आंचलला मारून टाका. अशा प्रकारच्या सध्या गोष्टी समाजामध्ये का वाढत चालले आहेत किंवा यावरती काय नेमकी लोकांची मानसिकता होत आहे किंवा ज्या मुली आहेत त्यांची काय मानसिकता आहेत? याविषयी आपण प्राध्यापक अपर्णा अष्टपुत्रे यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत.
advertisement
आजकाल आपल्याला लोकांमध्ये मालकी हक्क दाखवणं, ही गोष्ट मोठ्या प्रमाणात दिसत आहे. मुलगी माझी आहे, तर तिच्यावर माझा पूर्ण अधिकार आहे, मी म्हणलं त्याच पद्धतीने तिने सर्व गोष्टी कराव्यात, अशी एक पालकांची भावना असते. सर्व गोष्टी माझ्या नियंत्रणात असल्या पाहिजे अशी देखील लोकांची मानसिकता होत आहे. माझ्या मुलीच्या बाबतीतले सर्व निर्णय मी घेईल, अशी देखील एक पालकांची भावना असते. त्यामुळे तुम्ही कुठले चुकीचे पाऊल उचलत तिला शिक्षाही मी देणार असे देखील सध्याला मानसिकता होत चाललेली आहे. तसंच मुलींचे देखील आहे आयुष्य माझं आहे त्यामुळे मला असं हवं तसं मी करणार तसं मी वागणार.
advertisement
या सर्व गोष्टींमुळे अशा घटना वाढत चाललेल्या आहेत आणि यामध्ये माफ करणं सोडून देणे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या दोन्ही बाजूने होत नाही आहेत त्यामुळे देखील यालाही सर्व कारणे कारणीभूत आहेत. त्यामुळे मुलगी असो किंवा वडील असो यांनी अशा प्रकरणांमध्ये एकमेकांना समजून घेणे खूप गरजेचे आहे जेणेकरून या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या नियंत्रणात राहतील. आणि समाजाने देखील कुठल्याही गोष्टींवरती आपल्याला वाटेल तशा कमेंट करणं किंवा तसं भाष्य करणं हे योग्य नाही आहे असे देखील तज्ञांनी सांगितला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'बापाला फाशी द्या' म्हणणाऱ्या आंचलबद्दल उलट सुलट कमेंट का करताय लोकं? ही कोणती मानसिकता?
Next Article
advertisement
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement