Amit Shah: ओला दुष्काळ जाहीर होणार? गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीसांची 4 तास बैठक

Last Updated:

शिर्डी विमानतळावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शाह यांचं स्वागत केलं.

News18
News18
शिर्डी: राज्यात अतिवृष्टीमुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात अतोनात नुकसान झालं आहे. अशातच देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात दाखल झाले आहे. शिर्डीत एका कार्यक्रमासाठी अमित शाह आले आहे. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबत चर्चा केली. चारही नेत्यांमध्ये पाऊण तास बैठक पार पडली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शिर्डीत दाखल झाले आहे. शिर्डी विमानतळावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शाह यांचं स्वागत केलं. त्यानंतर  केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला.अमित शाह, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री आज शिर्डीत मुक्कामी आहे.  हॉटेलवर पोहचताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंमंत्र्याची शाह यांच्यासोबत बैठक झाली.
advertisement
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे तथा अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. राज्यातील पावसाची स्थिती आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीबाबत अमित शहा यांनी माहिती घेतली. चार नेत्यांमध्ये तब्बल पाऊण तास चर्चा झाली. या चर्चेची तपशील मात्र अद्याप समोर आला नाही.
पुढील आठवड्यात होणाऱ्या नवी मुंबई विमानतळ लोकार्पण, मेट्रो तीन तथा इतर विकास प्रकल्पांच्या संदर्भात अमित शहांनी आढावा घेतल्याची माहितीही समोर आली आहे.
advertisement
अर्ध मंत्रिमंडळ शिर्डीत
आज अमित शहा शिर्डीत मुक्काम करणार असून मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री देखील त्यांच्यासोबत असणार आहे. रविवारी अमित शाह साईदर्शनाने त्यांच्या दौऱ्याला सुरूवात करणार आहे. विविध कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित असणार आहे. मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री आजच अमित शहा यांच्यासोबत असणार असल्याने पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसंदर्भात काही चर्चा होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Amit Shah: ओला दुष्काळ जाहीर होणार? गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीसांची 4 तास बैठक
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement