Sharad Pawar : महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री, शरद पवारांनी भरसभेत सांगितली इच्छा, सुप्रिया सुळेंसाठी बॅटिंग?
- Published by:Suraj
Last Updated:
Sharad Pawar : निवडणुकीच्या प्रचारावेळी केलेल्या वक्तव्याने आता असा प्रश्न उपस्थित होतोय की शरद पवार हे सुप्रिया सुळे यांच्यासाठी बॅटिंग करतायत का?
मुंबई : राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असून अद्याप महायुती किंवा महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सांगितलेला नाही. मात्र सत्ता आली तर मुख्यमंत्री कोण होणार याचे संकेत दिले जात आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं विधान केलंय. निवडणुकीच्या प्रचारावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्याने आता असा प्रश्न उपस्थित होतोय की शरद पवार हे सुप्रिया सुळे यांच्यासाठी बॅटिंग करतायत का? महिला मतदारांना आपल्या बाजूने खेचण्यासाठी हा प्रयत्न सुरू असल्याच्याही चर्चा आहेत.
शरद पवार यांची शिरुर तालुक्यातल्या वडगाव रसाई इथं प्रचारसभा झाली. या सभेत ते म्हणाले की,"राज्यात आमच्या सत्ताकाळात महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राने घेतला. त्यानंतर हा निर्णय देशभर लागू झाला. आज ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत महिलांचा सहभाग वाढला आहे. आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा आहे." शरद पवारांच्या या विधानामुळे सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा रंगली आहे.
advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाची जबाबदारी सुप्रिया सुळे सांभाळत आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी शरद पवार यांच्यासोबत दिसत आहेत. राष्ट्रवादीत फूट पडण्याचं कारणही हेच असल्याचं म्हटलं जात आहे. शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं होतं की, त्या लोकांमुळे सुप्रिया सुळेंवर जबाबदारी नाही दिली आणि तेच लोक सोडून गेले.
advertisement
दरम्यान, शरद पवार यांनी सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार का या प्रश्नावर एका मुलाखतीत स्पष्ट उत्तर दिलंय. त्यांनी म्हटलं की, सुप्रिया सुळेंना लोकसभा वगळता दुसरं काही दिलं नाही. त्यांना विधानसभेत रस नाही. लोक काहीही चर्चा करतील, पण माझ्या मते सुप्रिया सुळे यांना विधानसभेत रस नाही. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आमच्या पक्षातले सर्व नेते घेतील. विधानसभेचे सदस्य एकत्र बसून याचा निर्णय घेतील. बहुमत नाही, निवडणुकीचा निकालही अजून नाही. त्याआधी मुख्यमंत्रिपदावर चर्चा करण्याला अर्थ नसल्याचंही पवारांनी म्हटलं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 16, 2024 8:05 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sharad Pawar : महाराष्ट्रात पहिली महिला मुख्यमंत्री, शरद पवारांनी भरसभेत सांगितली इच्छा, सुप्रिया सुळेंसाठी बॅटिंग?


