वरळीत ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा, कार्यकर्ते भिडले, मुख्यमंत्र्यांचा इशारा

Last Updated:

वरळीच्या सेंट रेजीसमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते.

'सेंट रेजीस'मध्ये राडा
'सेंट रेजीस'मध्ये राडा
मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांच्यात वरळीतील 'सेंट रेजीस'मध्ये जोरदार संघर्ष झाला. कामगार युनियनवरून दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. सेंट रेजिस हॉटेलबाहेर जवळपास अर्धा पाऊण तास प्रचंड गोंधळ सुरू होता.
ठाकरेंच्या कामगार युनियनमधील काही कार्यकर्त्यांनी भाजप प्रणित अखिल भारतीय कर्मचारी संघात प्रवेश केला. भाजपच्या याच फोडाफोडीविरोधात ठाकरेंची भारतीय कामगार सेना चांगलीच आक्रमक झाली आहे. दोन्ही बाजूकडील कार्यकर्ते पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले होते. पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने पुढील वाद टळला. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

ठाकरेंची सेना-भाजपचे कार्यकर्ते भिडले

advertisement
ठाकरेंसोबत कामगार कार्यकर्ते का राहत नाही, याचे त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले. तर असली फोडाफाडी आम्हाला मान्य नाही, आम्ही शांत बसणार नाही, असे भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
advertisement
सेंट रेजिसमध्ये भारतीय जनता पक्षाची यूनियन होतीच. आजही काही कार्यकर्ते आमच्याकडे आले. आमच्या युनियनचा बोर्ड लावण्याकरिता आम्ही आलो होतो जेणेकरून कामगारांचा युनियनशी चांगला संपर्क राहील आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी आम्हालाही आवाज उठवता येईल. परंतु ठाकरे सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी उगीचच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. भाजपने कोणतीही संघर्षाची भूमिका घेतलेली नाही, असे एका पदाधिकाऱ्याने न्यूज १८ लोकमतशी बोलताना सांगितले.
advertisement

राडा करणाऱ्यांवर कारवाई होणार- फडणवीस

राडा करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. सगळ्यांना कामगार युनियनमध्ये त्यांच्या त्यांच्या मनाप्रमाणे काम करण्याचा अधिकार आहे. संविधानानुसार सगळ्यांना मनाप्रमाणे काम करू द्यावे, असे फडणवीस म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वरळीत ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा, कार्यकर्ते भिडले, मुख्यमंत्र्यांचा इशारा
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement