advertisement

पतीला मारायचं होतं, EX चा झाला खेळ खल्लास, ऐनवेळी विवाहित गर्लफ्रेंडचा दगा, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!

Last Updated:

यवतमाळ जिल्ह्याच्या लाडखेड हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेनं आपल्या पतीच्या मदतीने एक्स बॉयफ्रेंडचा खून केला आहे.

यवतमाळमध्ये पतीच्या मदतीने महिलेकडून जुन्या प्रियकराची हत्या
यवतमाळमध्ये पतीच्या मदतीने महिलेकडून जुन्या प्रियकराची हत्या
भास्कर मेहरे, प्रतिनिधी यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्याच्या लाडखेड हद्दीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका महिलेनं आपल्या पतीच्या मदतीने एक्स बॉयफ्रेंडचा खून केला आहे. आरोपींनी भेटायला बोलवून त्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून चाकुने वार केले. हा हल्ला इतका भयंकर होता की तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अवघ्या २४ तासात पोलिसांनी या गुन्ह्याच्या छडा लावला असून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.
अतिष देशमुख असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर अंकुश खोडे आणि रुपाली खोडे असं अटक केलेल्या आरोपी पती पत्नीचं नाव आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अतिष आणि आरोपी रुपाली खोडे यांचं लग्नाआधी प्रेमसंबंध होते. यातूनच अतिष हा रुपालीला त्रास देत होता. तसेच तो पतीला सोडून देण्यासाठी रुपालीवर दबाव टाकत होता. एवढंच नव्हे तर त्याने रुपालीशी संगनमत करत पतीला संपवण्याचा प्लॅन देखील केला.
advertisement
मात्र रुपालीने ही बाब आपले पती अंकुशला सांगितली. यामुळे आरोपी पती अंकुशने अतिषला संपवण्याचा कट रचला. घटनेच्या दिवशी १५ तारखेला आरोपींनी फोन करून अतिशला लाडखेड परिसरात भेटायला बोलावलं होतं. अतिष याठिकाणी गेला असता आधीच तयारीत असलेल्या अंकुशने त्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून बेदम मारहाण केली. ज्यावेळी अतिष खाली कोसळला. त्यावेळी रुपालीने देखील चाकुने अतिषवर वार केले.
advertisement
हा हल्ला इतका भयंकर होता की अतिषचा जागीच मृत्यू झाला. अतिषची हत्या केल्यानंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते. मात्र अवघ्या २४ तासात पोलिसांनी खूनाचा उलगडा केला आहे. पोलिसांनी शेवटच्या फोन कॉल डिटेलचा तपास केला असता अतिषचं आरोपींसोबतचं कनेक्शन उघडकीस आलं. यानंतर पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता अनैतिक प्रेमसंबंधातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
advertisement
यानंतर स्थानिक गुन्हे शाखेनं पती-पत्नीला ताब्यात घेतलं आहे. रुपालीशी लग्नाआधी असलेल्या प्रेमसंबंधवरून अतिष त्रास देत होता, यातूनच ही हत्या केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. पोलीस या घटनेचा सविस्तर तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पतीला मारायचं होतं, EX चा झाला खेळ खल्लास, ऐनवेळी विवाहित गर्लफ्रेंडचा दगा, महाराष्ट्राला हादरवणारी घटना!
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement