अविश्वसनीय! 17 महिन्यांच्या बाळाने कमावले कोट्यवधी; 3.3 कोटी रुपयांनी चिमुकल्याची तिजोरी भरली
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
ऐकून आश्चर्य वाटेल पण एका 17 महिन्यांच्या मुलाने नुकतेच 3.3 कोटी रुपये कमावले आहेत. इन्फोसिस या मोठ्या कंपनीने दिलेल्या लाभांशामुळे हे शक्य झाले आहे आणि या लहानग्या गुंतवणूकदाराची कहाणी सध्या सगळ्यांनाच चकित करत आहे.
बेंगळूरु: एखादी व्यक्ती जन्माला येताच कमाई करू शकते, तेही इतकी की लोकांचा आकडा ऐकून विश्वास बसणार नाही. देशात एका 17 महिन्यांच्या मुलाने 3.3 कोटी रुपये कमावले आहेत. हे ऐकायला थोडे विचित्र वाटू शकते, पण हे सत्य आहे. खरं तर या मुलाला ही रक्कम लाभांश (डिव्हिडेंड) म्हणून मिळणार आहे.
17 महिन्यांचा एकाग्र हा इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांचा नातू आहे. 17 एप्रिल रोजी इन्फोसिसने आपल्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. ज्यात कंपनीने लाभांशाची घोषणाही केली. यामुळे नारायण मूर्ती यांचा 17 महिन्यांचा नातू एकाग्र रोहन मूर्तीला कंपनीकडून अंतरिम लाभांश म्हणून 3.3 कोटी रुपये मिळतील.
आला सिक्रेट रिपोर्ट; 2025 मध्ये काय घडणार? ज्यामुळे सगळेच चकित होतील
नारायण मूर्ती यांचा नातू ‘एकाग्र’ यांच्याकडे सध्या इन्फोसिसचे 15 लाख शेअर्स आहेत. जे कंपनीतील एकूण शेअर्सच्या 0.04 टक्के इतके आहेत. विशेष म्हणजे, हे शेअर्स एकाग्र फक्त चार महिन्यांचा होता तेव्हा नारायण मूर्ती यांनी तेव्हा भेट म्हणून दिले होते. मार्च २०२४ मध्ये या भेट दिलेल्या शेअर्सचे मूल्य 240 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. तथापि इन्फोसिसच्या सध्याच्या शेअरच्या किंमतीनुसार आता हे मूल्य 214 कोटी रुपये आहे.
advertisement
मिळाले सुमारे ११ कोटी रुपये
इन्फोसिसने आपल्या तिमाही निकालांमध्ये प्रति शेअर 22 रुपये अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. अशा परिस्थितीत एकाग्रकडे 15 लाख शेअर्स असल्याने, त्यांच्या लाभांशाची रक्कम 3.3 कोटी रुपये होईल. या पेमेंटसह चालू आर्थिक वर्षासाठी त्यांची एकूण लाभांश उत्पन्न 10.65 कोटी रुपये झाले आहे. वर्षाच्या सुरुवातीला त्याला कंपनीने जाहीर केलेल्या अंतरिम लाभांशाद्वारे 7.35 कोटी रुपये मिळाले होते.
advertisement
मूर्ती कुटुंबातील इतर अनेक सदस्य- जे इन्फोसिसच्या प्रवर्तक गटाचे सदस्य आहेत. त्यांनाही लाभांशातून चांगली रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे. यामध्ये खुद्द नारायण मूर्ती यांना 33.3 कोटी रुपये मिळतील. तर त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांना 76 कोटी आणि मुलगी अक्षता मूर्ती यांना 85.71 कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
इन्फोसिसने एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख 30 मे निश्चित केली आहे आणि लाभांशाचे पेमेंट ३० जून रोजी केले जाईल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 18, 2025 6:01 PM IST
मराठी बातम्या/मनी/
अविश्वसनीय! 17 महिन्यांच्या बाळाने कमावले कोट्यवधी; 3.3 कोटी रुपयांनी चिमुकल्याची तिजोरी भरली