Bajaj Finance FD : 7 वैशिष्टये! जी बजाज फायनान्स एफडीला बनवतात आदर्श गुंतवणूक पर्याय

Last Updated:

गुंतवणुकदारांच्या विविध गरजा पूर्ण करणारे बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट्स उत्तम पर्याय म्हणून समोर येतात. या लेखातून आज आम्ही बजाज फायनान्स एफडीला गुंतवणुकीचा आदर्श पर्याय करणाऱ्या सात वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती देत आहोत.

News18
News18
मुंबई 13 डिसेंबर : सतत बदलत जाणाऱ्या गुंतवणुकीच्या विश्वात प्रत्येक व्यक्ती अशी आर्थिक साधनं शोधतो जी फक्त परतावा देण्यासाठी वचनबद्ध आहेत असं नाही, तर सुरक्षितता आणि विश्वसनीयता प्रदान करतात. इतर अनेक पर्यायांमध्ये अनेक वैशिष्ट्ये असलेले, गुंतवणुकदारांच्या विविध गरजा पूर्ण करणारे बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट्स उत्तम पर्याय म्हणून समोर येतात. या लेखातून आज आम्ही बजाज फायनान्स एफडीला गुंतवणुकीचा आदर्श पर्याय करणाऱ्या सात वैशिष्ट्यांची सविस्तर माहिती देत आहोत.
आकर्षक व्याजदर
बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट्स च्या गाभ्यात आहे आकर्षक व्याजदरांसह गुंतवणुकदारांना सक्षम करण्याची अटळ वचनबद्धता. तुमचा पैसा केवळ वाढतोच असं नाही तर महागाईलाही पुरुन उरतो, तुमच्या संपत्तीचे खरे मूल्य टिकवतो, याच्या सुनिश्चितीचं महत्त्व कंपनीला समजतं. बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट्सवर 8.60% प्रती वर्षापर्यंत उच्च व्याजदर देतं. त्यामुळे आपल्या गुंतवणुकीवर खात्रीशीर परताव्याची अपेक्षा करणाऱ्यांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
advertisement
सर्वोच्च सुरक्षितता रेटिंग्ज
बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट्सला CRISIL AAA/STABLE आणि [ICRA]AAA/STABLE यांच्या सर्वोच्च सुरक्षितता रेटिंग असल्याने ते सर्वोत्तम ठरतात. यामुळे आपला निधी सुरक्षित असल्याची खात्री गुंतवणुकदारांना मिळते. बजाज फायनान्सची आर्थिक स्थैर्य आणि विश्वासार्हतेप्रती अटळ बांधिलकी त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिट्सच्या विश्वासार्हतेचा पुरावा आहे, त्याद्वारे ते गुंतवणुकदारांना विसंबून राहण्यासाठी एक आर्थिक भक्कमता प्रदान करतात.
advertisement
संचयी आणि अ-संचयी पर्याय
गुंतवणुकदारांना त्यांच्या गरजांनुसार आखीव गुंतवणूक धोरण तयार करण्याची सुविधा देत बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट्स संचयी आणि अ-संचयी व्याज देऊ करण्याचे पर्याय देतात. संचयी डिपॉझिट्स संबंधित कालावधीत व्याज जमा करुन गुंतवणूक काळ पूर्ण झाल्यावर एकरकमी पैसे देतात. तर अ-संचयी डिपॉझिट्स नियामित व्याज पैसे देऊ करत ज्यांना स्थिर उत्पन्न स्रोत हवा असतो त्यांची गरज पूर्ण करतात.
advertisement
त्रासमुक्त ऑनलाईन प्रक्रिया
बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये गुंतवणूक करणे हे फक्त परतावे पूर्ण करण्याबाबत नाही तर ते सोयीबाबत आहे. युझर-फ्रेंडली ऑनलाईन प्लॅटफॉर्म कागदपत्रे घेऊन काम करण्याची गरज राहू देत नाही आणि गुंतवणूकदारांना आपल्या घरातून आरामात संपूर्ण गुंतवणुकीचा प्रवास पूर्ण करू देतो. गुंतवणूकीसाठी आधुनिक आणि त्रासमुक्त पद्धती आजच्या तंत्रज्ञान-जाणकार गुंतवणुकदारांच्या प्राधान्याच्या गरजा पूर्ण करते आणि कमाल कार्यक्षमतेसाठी प्रक्रिया सुव्यवस्थित करते.
advertisement
कार्यकाळाची विस्तृत श्रेणी
गुंतवणुकदारांचे आर्थिक ध्येय वेगवेगळे असते हे समजून घेऊन बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट्स प्रदान करतात 12 ते 60 महिन्यांची लवचिक कालावधीची श्रेणी. त्यामुळे, तुम्ही अल्प कालावधीती फायदे शोधत असाल किंवा दीर्घकाळासाठी आर्थिक उद्दिष्ट्ये ठरवत असाल तेव्हा कालावधीतील वैविध्य तुमची गुंतवणूक आणि तुमच्या आर्थिक ध्येयांना अचूक जुळते आहे याची सुनिश्चिती करते.
advertisement
फिक्स्ड डिपॉझिट्सवर लोन
तुमच्या फिक्स्ड डिपॉझिट्सवर लोन घेण्याचा एकमेवाद्वितीय फायदा बजाज फायनान्स देऊ करते. एफडी धारकाला तातडीने रोख रकमेची गरज असेल तर संचयी एफडी असल्यास ठेव मूल्याच्या 75% पर्यंत लोन ते घेऊ शकतात आणि अ-संचयी एफडी असेल तर ठेव मूल्याच्या 60% लोन घेऊ शकतात. हे वैशिष्ट्य, गुंतवणुकदारांच्या फिक्स्ड डिपॉटला अकाली न मोडता त्याचे मूल्य वापरु देत आर्थिक लवचिकता प्रदान करते.
advertisement
बजाज फायनान्स एफडी कॅलक्युलेटर
गुंतवणूकदाराला आणखी सशक्त करण्यासाठी बजाज फायनान्स एक युझर-फ्रेंडली फिक्स्ड डिपॉझीट कॅलक्युलेटर उपलब्ध करुन देते. हे साध व्यक्तीला, मुद्दल, व्याजदर आणि कालावधी अशा विविध मापदंडांवर आधारित संभाव्य उत्पन्न काढण्यास (कॅलक्युलेट करण्यास) मदत करते. एफडी कॅलक्युलेटर आर्थि होकायंत्रासारखे काम करुन त्यांच्या गुंतवणुकांवर अंदाजित परताव्याची कल्पना देत गुंतवणुकदारांना माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करते.
निष्कर्ष
शेवटी, बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझित्स हे फक्त आर्थिक साधन नव्हे तर ते तुमच्या आर्थिक समृद्धीच्या प्रवासात एक विश्वासार्ह भागीदार आहेत. आकर्षक व्याजदर, सर्वोच्च सुरक्षितता रेटिंग्ज, लवचिक पेआउट पर्याय, त्रासमुक्त ऑनलाईन प्रक्रिया, आणि अमूल्य बजाज फायनान्स एफडी कॅलक्युलेटर यासह हे फिक्स्ड डिपॉझिट्स गुंतवणुकदारांना एक असर्वसमावेशक उपाय प्रदान करतात.
तुम्ही अनुभवी गुंतवणूकदार असाल किंवा तुमचा आर्थिक प्रवास नुकताच सुरू करत असाल, भविष्यात आर्थिक आत्मविश्वास आणि स्थिरता निर्माण करण्यासाठी बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिटचा तुमचा विश्वासू साथीदार म्हणून विचार करा. बजाज फायनान्स फिक्स्ड डिपॉझिट्सचा तुमच्या पसंतीचा गुंतवणूक मार्ग म्हणून निवडून स्थिर परतावा आणि आर्थिक सुरक्षेचे आश्वासन मिळवा.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Bajaj Finance FD : 7 वैशिष्टये! जी बजाज फायनान्स एफडीला बनवतात आदर्श गुंतवणूक पर्याय
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement