Aadhaar Card: 3 वर्ष जेल आणि 10 हजारांचा दंड, आधार कार्डवर एक चूक आणि आयुष्यभर कराल पश्चाताप
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Aadhaar Card Rule: या बदलनांमुळे फसवणूक होण्याचा धोका कमी होईल असा यू आयडीआयने केला आहे. तसंच फेक आधार कार्ड कसं ओळखयाचं हे देखील आज समजून घेऊया.
मुंबई : आधार कार्ड भारतीयांसाठी एक महत्त्वाचं कागदपत्र मानलं जातं, अगदी बँक खात्यापासून ते मोबाईल लिंक करण्यापर्यंत आधार कार्ड सगळीकडे जोडलं जातं. याच आधार कार्डसंदर्भात एक महत्त्वाचं बातमी आहे. आधार कार्ड सरकारी योजनांचा किंवा सरकारच्या सवलतींचा गैरवापर करण्यासाठी वापरलं जात असल्याचं समोर आलं आहे. आधार कार्डचा आधार घेऊन फसवणुकीचे प्रकार घडत आहेत, ह्या सगळ्याला आळा घालण्यासाठी सरकार ठोस पावलं उचलत आहे.
फसवणूक टाळण्यासाठी निर्णय
आधार कार्डसंदर्भात जर तुम्ही ही चूक केली तर तुम्हाला 3 वर्ष जेल आणि 10 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो. आधार कार्डच्या नियमात काही बदल करण्यात आले आहेत. हे बदल प्रत्येकाला माहिती असणं आवश्यक आहे. या बदलनांमुळे फसवणूक होण्याचा धोका कमी होईल असा यू आयडीआयने केला आहे. तसंच फेक आधार कार्ड कसं ओळखयाचं हे देखील आज समजून घेऊया.
advertisement
UIDAI ने नावनोंदणी आणि आधार कार्ड अपडेट करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. आता आधार कार्डधारक आपली माहिती ऑनलाइन किंवा ऑफलाइन मोडद्वारे सहजपणे अपडेट करू शकतात. नवीन नियमांनुसार, आधार कार्डमधील लोकसंख्याविषयक तपशील जसे की नाव, पत्ता इत्यादी अपडेट करणे पूर्वीपेक्षा सोपं झालं आहे.
advertisement
काय आहे नवीन नियम
आता बरीच माहिती ऑनलाइन अपडेट केली जाऊ शकते, जी पूर्वी फक्त नावनोंदणी केंद्राला भेट देऊन शक्य होती. आधार अपडेटसाठी नवीन फॉर्म जारी केले आहेत, ते भरून माहिती अपडेट केली जाऊ शकते. अनिवासी भारतीयांसाठी (एनआरआय) स्वतंत्र फॉर्म जारी करण्यात आले आहेत, जेणेकरून ते त्यांची माहिती सहज अपडेट करू शकतील.
advertisement
बनावट आधार कार्ड ओळख
बनावट आधार कार्ड ओळखणे महत्त्वाचे आहे, कारण त्याचा अनेक प्रकारच्या फसवणुकीसाठी गैरवापर होऊ शकतो. UIDAI ने बनावट आधार कार्ड ओळखण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. याचा उपयोग करून आधार कार्ड बनावट आहे की नाही ते तुम्ही सहज ओळखू शकता. आधार कार्डवर असलेल्या QR कोडची सत्यता स्कॅन करून तपासली जाऊ शकते. UIDAI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधार क्रमांकाची पडताळणी केली जाऊ शकते. खऱ्या आधार कार्डची छपाई आणि कागदाची गुणवत्ता जास्त असते, तर बनावट कार्डची गुणवत्ता कमी असते, किंवा त्याचा पेपर वेगळा असतो.
advertisement
नियमांचे उल्लंघन आणि दंड
आधार कार्डशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे. जर एखादी व्यक्ती बनावट आधार कार्ड वापरताना पकडली गेली तर त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी आणि त्याची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी UIDAI ने हा दंड निर्धारित केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 30, 2024 12:38 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Aadhaar Card: 3 वर्ष जेल आणि 10 हजारांचा दंड, आधार कार्डवर एक चूक आणि आयुष्यभर कराल पश्चाताप