advertisement

Agriculture Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये काय? 32 पिकांचे 109 नवीन वाण आणणार, किसानकार्डबाबत मोठी घोषणा

Last Updated:

Agriculture Budget 2024 : अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी यासाठी आर्थिक तरतूद करताना 21 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये काय?
शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये काय?
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज 2024-25 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांकडे विशेष लक्ष देण्यात आल्याचं दिसतंय. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक गुड न्यूज आहेत. सरकारने कृषी आणि संबंधित क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपये दिले. गेल्या वर्षी 1.25 लाख कोटी रुपये देण्यात आले होते. म्हणजेच यावेळी शेतकऱ्यांच्या बजेटमध्ये 21.6 टक्के म्हणजेच 25 हजार कोटींची वाढ करण्यात आली आहे. मात्र, शेतकऱ्यांची महत्त्वाची मागणी असलेली किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपीबाबत अर्थसंकल्पात कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. किसान सन्मान निधीच्या रकमेतही वाढ करण्यात आलेली नाही.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय घोषणा?
  • कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागच्या अर्थसंकल्पापेक्षा 21 टक्के वाढ
  • राज्यांशी भागीदारी करून आम्ही कृषी आणि शेतकऱ्यांसाठी डिजिटल पायाभूत सुविधांवर काम करू.
  • 6 कोटी शेतकऱ्यांची माहिती जमिनीच्या रजिस्ट्रीमध्ये आणले जाईल
  • 5 राज्यांमध्ये नवीन किसान क्रेडिट कार्ड जारी केले जातील
  • नैसर्गिक शेती वाढवण्यावर सरकारचा भर आहे.
  • ज्या ग्रामपंचायतींना ही योजना राबवायची आहे त्यांना प्रोत्साहन दिले जाईल.
  • सरकार 32 पिकांसाठी 109 वाण आणणार आहे.
  • कृषी क्षेत्राची उत्पादकता आणि कार्यक्षमता याला प्राधान्य.
  • कृषी, रोजगार आणि सामाजिक न्याय याला प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • डाळी आणि तेलबियांची उत्पादकता आणि साठवणूक वाढवण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणार
advertisement
अर्थमंत्र्यांची शेतकऱ्यांना भेट
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी त्यांचा सलग सातवा अर्थसंकल्प सादर केला, ज्यात रोजगार, कौशल्य विकास, कृषी आणि उत्पादनावर लक्ष केंद्रित करून 2047 पर्यंत 'विकसित भारत'चा रोडमॅप सादर केला आहे. मोदी 3.0 अंतर्गत पहिला अर्थसंकल्प आर्थिक दृष्टीकोन सेट करतो, जो वित्तीय विवेक लक्षात घेऊन तयार केला गेला आहे. 2014 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा हा सलग 13वा अर्थसंकल्प आहे, ज्यामध्ये दोन अंतरिम अर्थसंकल्पांचा समावेश आहे.
advertisement
केंद्रीय अर्थसंकल्प ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी अधिक वाटप, करप्रणाली सुधारणा, पायाभूत सुविधांना चालना, स्थानिक उत्पादनावर भर, रोजगार आणि कौशल्य निर्मिती आणि अधिक श्रम-केंद्रित क्षेत्रांमध्ये उत्पादन-लिंक्ड प्रोत्साहन (PLI) वाटप यावर लक्ष केंद्रित करतो. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Agriculture Budget 2024 : शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये काय? 32 पिकांचे 109 नवीन वाण आणणार, किसानकार्डबाबत मोठी घोषणा
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement