धाराशिवमध्ये दुष्काळाची दाहकता, पाण्याअभावी ऊसाचे पिक जळाले, शेतकऱ्यांकडून फिरवला जातोय नांगर
- Published by:News18 Marathi
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
धाराशिव जिल्ह्यातलं सर्वात मोठं धरण म्हणजे सीना कोळेगावचं धरण आहे. याच धरण परिसरात उसाच्या पिकावर नांगर फिरवला जातोय.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : मराठवाडा हा भाग दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. मराठवाड्यात सध्या मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे. खरंतर एक दुष्काळ पडला की तो पचवायला शेतकऱ्यांना दोन वर्षांचे उत्पन्न द्यावं लागतं, असं म्हटलं जातं. धाराशिव जिल्ह्यातलं सर्वात मोठं धरण म्हणजे सीना कोळेगावचं धरण आहे. याच धरण परिसरात उसाच्या पिकावर नांगर फिरवला जातोय. याला कारण म्हणजे दुष्काळाची दाहकता होय.
advertisement
उसाच्या पिकावर शेतकऱ्यांनी फिरवलाय नांगर
दुष्काळाची दाहकता इतकीय की धरण परिसरातील 70 टक्के ऊसाच्या पिकावर शेतकऱ्यांनी नांगर फिरवलाय. खोडव्याचा ऊस मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर दुष्काळामुळे आलीय. धाराशिव जिल्ह्यातल्या एकट्या परंडा तालुक्यात 22500 हेक्टर हजार हेक्टर उसाचे क्षेत्र आहे परंतु केवळ 6700 हजार हेक्टर क्षेत्र उरले बाकी क्षेत्रावर शेतकऱ्यांनी नांगर फिरवलाय.
यंदा खरीप हंगाम करणार कमाल, शेतकरी होणार मालामाल; कोणत्या पिकांना होणार फायदा?
सीना कोळेगाव धरण हे धाराशिव जिल्ह्यातलं सर्वात मोठा धरण आहे. या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 5.23 टीएमसी इतके आहे. परंतु सध्या धरणात केवळ 10.84 दशलक्ष घनमीटर इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे जो मृत पाणीसाठा आहे. त्यामुळे परिसरातील धरणावर आधारित असलेल्या शेतीला पाणी मिळत नसल्याने उसाच्या क्षेत्रात मोठी घट निर्माण झाली आहे.
advertisement
धरणांमध्ये पाणीसाठा शिल्लक नाही
सोनारी, डोमगाव, रोसा अशी अनेक गावे आहेत जी सिना कोळगावच्या धरणावर आधारित आहेत. त्याचबरोबर परंडा तालुक्यातील चांदणी, साकत असे अनेक धरणे आहेत की ज्या धरणांमध्ये पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे जनावरांच्या आणि लोकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. दुष्काळामुळे हजारो हेक्टर वरील उसाचे क्षेत्र मोडीत निघालेय. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
advertisement
शेतकऱ्यांचे नुकसान
एक एकर उसाची लागवड करण्यासाठी ते कारखान्यापर्यंत ऊस पोहोचवण्यासाठी शेतकऱ्यांना 50 ते 60 हजार रुपयांचा प्रति एकरी खर्च येतो तर खोडव्याचा ऊस मोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर आलीय. त्यातच त्यातच अद्यापही करपलेला ऊस पावसाची वाट पाहतोय. मी दोन एक्कर उसाची लागवड केली होती, परंतु या वर्षी पाण्याअभावी ऊसाचे पिक जळालेले आहे,असंच अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे तरी सरकारने पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी उस उत्पादक शेतकरी राजकुमार हांगे यांनी केलीय.
Location :
Osmanabad,Osmanabad,Maharashtra
First Published :
June 08, 2024 9:06 AM IST
मराठी बातम्या/मनी/कृषी/
धाराशिवमध्ये दुष्काळाची दाहकता, पाण्याअभावी ऊसाचे पिक जळाले, शेतकऱ्यांकडून फिरवला जातोय नांगर