एकेकाळी होती अत्यंत दयनीय अवस्था, आज आहेत अनेक नोकर, एका निर्णयानं बदललं महिलेचं आयुष्य

Last Updated:

हजीराबानो या गावातील रहिवासी आहेत. मजूरी करुन त्या आपले पालनपोषण करायच्या. मात्र, त्या कार्यात त्यांचे मन लागत नव्हते.

हजीराबानो
हजीराबानो
सौरभ वर्मा, प्रतिनिधी
रायबरेली : महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. महिलासुद्धा सरकारच्या या मोहिमेत सहभागी होत असून आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. तसेच यशस्वीसुद्धा होत आहेत. महिला आता घराबाहेर जाऊन रोजगाराच्या संधी निर्माण करत आहेत.
नोकरीपासून राजकीय क्षेत्रातही महिला आपले अस्तित्त्व सिद्ध करत आहे. यातच आता रायबरेली जिल्ह्यातील रहिवासी हजिराबानो हिने आपली मेहनत आणि कार्यकुशलतेने महिलाही कुणापेक्षा कमी नाही, हे सिद्ध केले आहे. हजीराबानो या रायबरेली जिल्ह्यातील कुम्हरावा गावातील रहिवासी आहेत. मजूरी करुन त्या आपले पालनपोषण करायच्या. मात्र, त्या कार्यात त्यांचे मन लागत नव्हते.
advertisement
त्यामुळे त्यांनी गावातील एका तरुणापासून कुक्कुटपालनाची माहिती घेतली. हा तरुण आधीपासून कुक्कुटपालन कर होता. त्याच्यापासून माहिती घेतल्यावर मी बँकेतून कर्ज काढून आपल्या जमिनीवर कुक्कुटपालनाचे काम सुरू केले. या माध्यमातून आता त्यांना कमी खर्चात जास्त नफा मिळत आहे.
advertisement
कमी खर्चात जास्त नफा -
लोकल18ला हजीरा बानो यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी 1 बिघा जमिनीवर पोल्ट्री फार्म बांधले आणि आता त्या कुक्कुटपालन करत आहेत. या कामासाठी सुरुवातीला 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. तर या माध्यमातून वर्षाला तीन ते चार लाख रुपये सहज मिळतात. आता त्यांना कामासाठी दुसऱ्याच्या घरी जाण्याची गरज नाही. त्या स्वतः गावातच अर्धा डझनहून अधिक लोकांना रोजगार देत आहेत. या कामात त्यांचे पतीही त्यांना पूर्ण मदत करतात.
advertisement
मोबाईलने होते विक्री -
हजिरा बानो यांनी सांगिलते की, त्यांना विक्रीसाठी कुठेही बाहेर जायची गरज पडत नाही. सर्व काम मोबाईलवर होते. मोबाईलद्वारे बुकिंग केल्यानंतर खरेदीदार फॉर्ममधूनच त्यांची खरेदी करतात. त्यांचा वाहतुकीचा खर्चही वाचतो.
मराठी बातम्या/मनी/कृषी/
एकेकाळी होती अत्यंत दयनीय अवस्था, आज आहेत अनेक नोकर, एका निर्णयानं बदललं महिलेचं आयुष्य
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement