मोठी बातमी! भारतासाठी Apple डोनाल्ड ट्रम्पशी नडले, Iphoneच्या उत्पादनावरून घेतली टोकाची भूमिका

Last Updated:

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी ॲपलच्या भारतातील उत्पादनावर वक्तव्य केले, पण ॲपलने गुंतवणूक योजनांमध्ये बदल केला नाही. भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योग आत्मविश्वासाने भरलेला आहे.

News18
News18
नवी दिल्ली: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलच्या भारतातील वाढत्या उत्पादनावर केलेल्या वक्तव्यावर संपूर्ण देशात चर्चा होत आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्याकडे भारताकडून कमी महत्त्व दिले जात आहे, अशात एक मोठी अपडेट समोर येत आहे. सीएनबीसी-टीव्ही१८ च्या सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, ॲपलने भारत एक प्रमुख उत्पादन केंद्र म्हणून वापरण्याच्या आपल्या वचनबद्धतेला पुन्हा दुजोरा दिला आहे.
सूत्रांनी सांगितले की,ॲपलच्या भारतातील गुंतवणूक योजनांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. ट्रम्प यांच्या विधानानंतरही कंपनीने आपले कार्य सुरू ठेवण्याची ग्वाही भारतीय सरकारला दिली आहे.
दोहा येथील एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की, त्यांनी ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांच्याशी थेट संवाद साधला आणि ॲपलने भारतात उत्पादन वाढवू नये, असा सल्ला दिला होता. मात्र जर ते केवळ भारतीय बाजारपेठेसाठी असेल तर ठीक आहे, असेही ते म्हणाले.
advertisement
ट्रम्प यांची Appleला धमकी,भारतात पाऊल ठेवायचं नाही; ते स्वत: काय ते बघून घेतील
ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार,15 मे रोजी कतारमधील दोहा येथे एका व्यावसायिक कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले, ॲपलचे सीईओ टिम कूक यांना मी सांगितले की, तुमची भारतात उत्पादन करण्याची गरज नाही, ते स्वतःची काळजी घेऊ शकतात. ट्रम्प यांनी असेही सांगितले की, ॲपल अमेरिकेत आपले उत्पादन वाढवेल. ॲपल अमेरिकेत आपले उत्पादन वाढवणार आहे, असे ते म्हणाले.
advertisement
भारताने घेतला विश्वासघाताचा बदला; पाकिस्तानला केलेल्या मदतीने वाटोळे झाले
भारताने अमेरिकेच्या आयातीवरील शुल्क पूर्णपणे माफ करण्याची ऑफर दिली असल्याचेही त्यांनी सांगितले. दोहा येथील व्यावसायिक नेत्यांच्या एका मेळाव्यात बोलताना ते म्हणाले, भारताने आम्हाला एक करार देऊ केला आहे. ज्यात ते अक्षरशः आमच्याकडून कोणतेही शुल्क आकारण्यास तयार आहेत.
यावर बोलताना इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ इंडिया (ईएलसीआयएनए) चे सरचिटणीस राजो गोयल म्हणाले, यामुळे थोडा विलंब होऊ शकतो, पण मला खरोखरच असे वाटत नाही की त्याचा भारतावर फारसा परिणाम होईल. ॲपलच्या जागतिक बाजारात आपला वाटा अजूनही खूपच कमी आहे.
advertisement
इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात भारत खूप मजबूत स्थितीत आहे. यामुळे आपण निराश होऊ नये... मला खात्री आहे की डोनाल्ड ट्रम्प आपली भूमिका बदलू शकतात, असेही ते म्हणाले.
भारत ॲपलच्या जागतिक पुरवठा साखळीचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. फॉक्सकॉन आणि पेगाट्रॉन सारख्या कंत्राटी उत्पादकांनी भारताच्या उत्पादन-संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजनेअंतर्गत आपले कामकाज मोठ्या प्रमाणात वाढवले आहे आणि ॲपलच्या भारतातील आयफोन निर्यातीने गेल्या वर्षी उच्चांक गाठला आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
मोठी बातमी! भारतासाठी Apple डोनाल्ड ट्रम्पशी नडले, Iphoneच्या उत्पादनावरून घेतली टोकाची भूमिका
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement