फक्त 100 रुपयांत व्हा करोडपती! LIC ने आणलीये सर्वात बेस्ट SIP

Last Updated:

Best Investment Plan: एलआयसीनं ग्राहकांसाठी विशेष दैनिक, मासिक, मायक्रो आणि त्रैमासिक अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जाणून घेऊया या एसआयपीच्या प्लॅनची सविस्तर माहिती गुंतवणूक सल्लागार रुचिर थत्ते यांच्याकडून...

+
श्रीमंत

श्रीमंत होण्याचा राजमार्ग.

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : गेल्या काही वर्षांपासून म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जुलै 2024 मध्ये म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवणूकदारांनी तब्बल 23,000 कोटींहून अधिक पैसे गुंतवले. यावरूनच याचं महत्त्व अधोरेखित होतं. मात्र, अनेकदा इच्छा असूनही कमी उत्पन्न असलेल्या लोकांना यात गुंतवणूक करता येत नाही. अशात छोट्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
advertisement
LIC म्युच्युअल फंडने आता लहान रक्कमेची सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेन्ट प्लॅन (SIP) म्हणजेच एसआयपीची योजना आणली आहे. यामुळेच गुंतवणूकदारांना कमी रक्कमेनं एसआयपी सुरू करता येणार आहे. एलआयसीनं ग्राहकांसाठी विशेष दैनिक, मासिक, मायक्रो आणि त्रैमासिक अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. जाणून घेऊया या एसआयपीच्या प्लॅनची सविस्तर माहिती गुंतवणूक सल्लागार रुचिर थत्ते यांच्याकडून...
advertisement
दैनिक एसआयपी
दैनिक एसआयपी हफ्त्यांची संख्या ही किमान 60 आहे. कंपनीनं दररोज, मासिक आणि त्रैमासिक हे 3 पर्याय ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी वेगवेगळा कालावधी, किमान एसआयपी रक्कम आणि हफ्त्यांची संख्याही जाहीर करण्यात आलीये. ही एसआयपी एलआयसी म्युच्युअल फंड, ईएलएसएस टॅक्स सेव्हर आणि एलआयसी म्युच्युअल फंड युलिप वगळता सर्व म्युच्युअल फंड योजनांना लागू आहे. एलआयसीची दैनिक एसआयपी ही 100 रुपयांची आहे.
advertisement
मासिक एसआयपी
मासिक एसआयपीसाठीची रक्कम ही किमान 200 रुपये इतकी आहे. यासाठी हफ्त्यांची संख्या आहे 30. यातून मिळणारा परतावा हा जास्त आहे. मासिक एसआयपी ही महिन्याच्या 1 ते 28 तारखांना करता येते.
मायक्रो एसआयपी
मायक्रो एसआयपींमध्ये अगदी थोड्या प्रमाणात गुंतवणूक करून कंपनीचे भागीदार बनू शकता. ही एसआयपी जे कमी कमवतात किंवा ज्यांनी नुकतंच कमवायला सुरुवात केलीये त्यांच्यासाठी फायदेशीर ठरते.
advertisement
त्रैमासिक एसआयपी
त्रैमासिक एसआयपी ही ईएलएसएस टॅक्स सेव्हर स्कीमच्या अंतर्गत चालवली जाते. 16 ऑक्टोबर 2024च्या नियमावलीनुसार किमान रक्कम ही 1,000 रुपये किंवा 500 रुपयांच्या पटीसाठी आहे. तर यासाठीच्या हप्त्यांची संख्या आहे 6.
view comments
मराठी बातम्या/मनी/
फक्त 100 रुपयांत व्हा करोडपती! LIC ने आणलीये सर्वात बेस्ट SIP
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement