Budget 2025: महाराष्ट्रानंतर मोदी सरकारचं मिशन बिहार! शेतकरी ते सर्वसामान्यांसाठी खास गिफ्ट, मोठी घोषणा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
Budget 2025: मोदी सरकारकडून बिहारसाठी खास गिफ्ट, बजेटमधून अर्थमंत्री सीतारमण यांची मोठी घोषणा
मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केलं. या बजेटमध्ये बिहारला डोळ्यासमोर ठेवून काही महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. मोदी सरकारने बजेट 2025-26 मध्ये बिहार राज्यासाठी या बजेटमधून खास गिफ्ट दिलं आहे. कृषी सेक्टरमध्ये महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. त्यामुळे बिहार सरकारला आणि तिथल्या शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.
बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बजेटमध्ये बिहारसाठी खास घोषणा केल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. बिहारमध्ये शेतकऱ्यांसाठी काय घोषणा करण्यात आल्या आहेत जाणून घेऊया.
अर्थमंत्र्यांची बिहारला भेट
तूर, उडीद, मसूर यांचे उत्पादन वाढवण्यावर भर
मखाना बोर्ड स्थापन केले जाणार
बिहारच्या मखाना शेतकऱ्यांना प्रोत्साहन देईल
शेतकऱ्यांना शेतीसाठी योग्य मोबदला द्या.
मत्स्य उत्पादनाला चालना देण्यावर भर द्यावा
advertisement
याशिवाय किसान क्रेडिट कार्डची रक्कम 3 लाखांवरुन 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. SMEs साठी क्रेडिट गॅरेंटी वाढवून 10 लाखांपर्यंत केली आहे. स्टार्टअप क्रेडिट गॅरेंटी 20 लाख रुपये करण्यात आली आहे. 7 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना 3 लाख ऐवजी आता 5 लाख रुपयांपर्यंत किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत लोन मिळणार आहे.
advertisement
याशिवाय बिहारमध्ये नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ फूड टेक्नोलॉजी नव्याने उभारण्याचा मानस या बजेटमध्ये असल्याचं सांगितलं आहे. IIT पटनाचाही विस्तार करण्यावर भर देणार असल्याचं बजेटमध्ये सांगितलं आहे. बिहारमध्ये शैक्षणिक विकासाला चालना देण्यासाठी मेडिकल एज्युकेशन, IIT संस्था विस्तार करण्यावर मोदी सरकार भर देणार आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 01, 2025 11:36 AM IST
मराठी बातम्या/मनी/
Budget 2025: महाराष्ट्रानंतर मोदी सरकारचं मिशन बिहार! शेतकरी ते सर्वसामान्यांसाठी खास गिफ्ट, मोठी घोषणा


