advertisement

Budget 2026: भारतीय आयुर्वेदाचा डंका आता जगभर! निर्यातीला बळ, रोजगाराची मोठी संधी, बजेटमध्ये कोणती घोषणा?

Last Updated:

Budget 2026: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर करताना भारतीय पारंपरिक चिकित्सा पद्धतीसाठी, विशेषतः आयुर्वेदासाठी मोठी तिजोरी उघडली आहे.

Budget 2026: भारतीय आयुर्वेदाचा डंका आता जगभर! निर्यातीला  बळ, रोजगाराची मोठी संधी, बजेटमध्ये  कोणती घोषणा?
Budget 2026: भारतीय आयुर्वेदाचा डंका आता जगभर! निर्यातीला बळ, रोजगाराची मोठी संधी, बजेटमध्ये कोणती घोषणा?
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर करताना भारतीय पारंपरिक चिकित्सा पद्धतीसाठी, विशेषतः आयुर्वेदासाठी मोठी तिजोरी उघडली आहे. "भारतीय योगाचा आणि आयुर्वेदाचा जगभर प्रसार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे म्हणत त्यांनी या क्षेत्राचा कायापालट करणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

>> उच्च दर्जाची आयुर्वेदिक उत्पादने आता जागतिक बाजारपेठेत

अर्थमंत्र्यांनी जाहीर केले की, भारत आता उच्च दर्जाच्या आयुर्वेदिक उत्पादनांच्या निर्यातीवर विशेष लक्ष देणार आहे. जागतिक दर्जाची गुणवत्ता राखण्यासाठी आणि आयुर्वेदिक औषधांच्या चाचणीसाठी 'राष्ट्रीय प्रयोगशाळा' (National Laboratories) स्थापन केल्या जातील. यामुळे 'मेड इन इंडिया' आयुर्वेदिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी प्रतिष्ठा मिळणार आहे.
advertisement

>> आरोग्य क्षेत्रात तरुणांसाठी रोजगाराची मोठी संधी...

केवळ उत्पादनेच नव्हे, तर तज्ज्ञ मनुष्यबळ तयार करण्यासाठी सरकारने विशेष योजना जाहीर केली आहे. पुढील ५ वर्षांत १ लाख तज्ज्ञ आरोग्यसेवा व्यावसायिक तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वृद्ध आणि रुग्णांची देखभाल करण्यासाठी १.५ लाख केअरटेकर म्हणून प्रशिक्षित केले जाईल. तरुणांना या क्षेत्रात करिअरचे नवे मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी सरकार विशेष प्रशिक्षण योजना राबवणार असल्याचे केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी जाहीर केले.
advertisement

>> आयुर्वेदाची ३ नवीन 'AIIMS' आणि जामनगरचे महत्त्व

आरोग्य पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी देशात 'एम्स' च्या धर्तीवर (AIIMS) तीन रुग्णालये बांधली जाणार आहेत. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदची सुरुवात केली जाणार आहे. तसेच, गुजरातच्या जामनगरमध्ये 'वैश्विक आरोग्य चिकित्सा केंद्र' उभारले जाणार आहे आयुर्वेदाचे मुख्य केंद्र ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Budget 2026: भारतीय आयुर्वेदाचा डंका आता जगभर! निर्यातीला बळ, रोजगाराची मोठी संधी, बजेटमध्ये कोणती घोषणा?
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement