डायरेक्टरच्या घरावर छापा, 9 लाखांच्या लाचसाठी घरी शिरले खरे आणि CBI च्या हाती लागला पैसाच पैसा, मोजण्यात अधिकाऱ्यांना फुटला घाम
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तपास यंत्रणा एका छोट्याशा लाचेच्या प्रकरणाचा छडा लावायला एका घरात शिरते आणि तिथे कपाटाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या सुटकेस उघडताच अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारतात.
बंगळूरु : एखाद्या चित्रपटातीलच काहाणी वाटावी अशी घटना बेंगळुरूमध्ये पाहायला मिळाली. ज्याने सगळ्यांना चक्रावून सोडलं आहे. जेव्हा आपण भ्रष्टाचाराच्या बातम्या वाचतो, तेव्हा अनेकदा लाखांच्या अफरातफरीची चर्चा असते. पण कल्पना करा, तपास यंत्रणा एका छोट्याशा लाचेच्या प्रकरणाचा छडा लावायला एका घरात शिरते आणि तिथे कपाटाच्या कोपऱ्यात ठेवलेल्या सुटकेस उघडताच अधिकाऱ्यांचे डोळे विस्फारतात. कारण यात लाखात पैसा नसतो, तर ती किंमत करोडोंची असते. त्यात नोटांच्या इतक्या थप्प्या होत्या की त्या मोजण्यासाठी मशीन मागवावी लागते.
बेंगळुरूमध्ये सीबीआयने (CBI) केलेल्या कारवाईत नेमकं हेच घडलं आहे. एका सरकारी अधिकाऱ्याने भ्रष्टाचाराची ही 'काळी कमाई' कोणत्याही कपाटात नाही, तर चक्क तीन मोठ्या सुटकेसमध्ये भरून ठेवली होती. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ माजली आहे.
बेंगळुरू येथील केंद्रीय विद्युत संशोधन संस्था (CPRI) मध्ये कार्यरत असलेले संयुक्त संचालक राजाराम मोहनराव चेनू यांना सीबीआयने अटक केली आहे. ही कारवाई 9.5 लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून करण्यात आली होती. मात्र, जेव्हा सीबीआयने त्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली, तेव्हा जे हाती लागलं ते पाहून अधिकारीही थक्क झाले. लाचेची किंमत लाखात होती, पण वसुली मात्र कोट्यवधीत झाली.
advertisement
सर्च ऑपरेशन दरम्यान सीबीआयला आरोपी अधिकाऱ्याच्या ताब्यातून तब्बल 3 कोटी 76 लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही सर्व रोकड तीन मोठ्या सुटकेसमध्ये अक्षरशः ठुसठुसून भरली होती. एखाद्या अधिकाऱ्याने आपल्या पदाचा गैरवापर करून सिस्टीमला कशाप्रकारे वाळवी लावली आहे, याचे हे जिवंत उदाहरण ठरलं आहे.
सीबीआयने या प्रकरणात केवळ सरकारी अधिकाऱ्यालाच नाही, तर लाच देणाऱ्यालाही बेड्या ठोकल्या आहेत:
advertisement
यामध्ये राजाराम मोहनराव चेनू: संयुक्त संचालक, CPRI (मुख्य आरोपी) आहेत. तर अतुल खन्ना हे संचालक, मेसर्स सुधीर ग्रुप ऑफ कंपनीज (सह-आरोपी) आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 10, 2026 6:11 PM IST
मराठी बातम्या/मनी/
डायरेक्टरच्या घरावर छापा, 9 लाखांच्या लाचसाठी घरी शिरले खरे आणि CBI च्या हाती लागला पैसाच पैसा, मोजण्यात अधिकाऱ्यांना फुटला घाम










