Tesla Hiring in India: एलन मस्कची मोठी घोषणा, टेस्लाची भारतातील पहिली भरती मुंबईत, कसा अर्ज कराल?

Last Updated:

Tesla Hiring In Mumbai: ई-वाहन कंपनी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी भारतात नोकर भरतीची तयारी सुरू केली आहे. कंपनीने मुंबई लोकेशनसाठी 13 पदांसाठी भरतीची जाहिरात देण्यात आली आहे. यावरून स्पष्ट होते की टेस्ला लवकरच भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणार आहे.

News18
News18
मुंबई: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांच्या टेस्ला (Tesla) कंपनीत काम करण्याची संधी मिळाली तर कोण नकार देईल? आतापर्यंत केवळ भारताबाहेर कार्यरत असलेली ही इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी आता भारतात आपली एंट्री करण्याच्या तयारीत आहे. यासाठी कंपनीने अधिकृत भरती प्रक्रियाही सुरू केली आहे.
टेस्लाची भारतात मोठी भरती सुरू
टेस्ला कंपनीच्या भारतातील भरतीबाबतची माहिती समोर येताच अनेकांच्या मनात हेच प्रश्न निर्माण झाले की कोणत्या पदांसाठी ही भरती होणार आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटनुसार, ही भरती मुंबई लोकेशनसाठी होणार असून 13 वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत.
advertisement
ही दोन पदे सर्वाधिक महत्त्वाची
टेस्लाच्या म्हणण्यानुसार, कंपनी विविध पदांसाठी भरती करत असली तरी व्यवसाय संचालन विश्लेषक (Business Operations Analyst) आणि ग्राहक सहाय्य विशेषज्ञ (Customer Support Specialist) ही दोन पदे सर्वाधिक महत्त्वाची असतील. या पदांवरील कर्मचाऱ्यांना भारतातील टेस्लाच्या प्रवेशासाठी एक प्रमुख भूमिका बजवावी लागणार आहे. टेस्लाच्या भारतात येण्यापूर्वी ते आवश्यक वातावरण तयार करण्याचे काम करतील.
advertisement
कुठल्या पदांसाठी होणार भरती?
सेवा सल्लागार (Service Advisor)
‘पार्ट्स’ सल्लागार (Parts Advisor)
सेवा तंत्रज्ञ (Service Technician)
सेवा व्यवस्थापक (Service Manager)
विक्री आणि ग्राहक सहाय्य (Sales & Customer Support)
स्टोअर व्यवस्थापक (Store Manager)
व्यवसाय संचालन विश्लेषक (Business Operations Analyst)
ग्राहक सहाय्य पर्यवेक्षक (Customer Support Supervisor)
advertisement
ग्राहक सहाय्य विशेषज्ञ (Customer Support Specialist)
वितरण संचालन विशेषज्ञ (Delivery Operations Specialist)
ऑर्डर संचालन विशेषज्ञ (Order Operations Specialist)
अंतर्गत विक्री सल्लागार (Inside Sales Advisor)
ग्राहक सहभाग व्यवस्थापक (Consumer Engagement Manager)
टेस्ला भारतात का करत आहे भरती?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यात टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांची भेट घेतली होती. यानंतर भारतीय सरकारने ई-वाहन आयातीवरील शुल्क 110% वरून 70% पर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत टेस्लाला संधी देण्यासाठी सरकार सकारात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
advertisement
टेस्लानेही भारतात आपला विस्तार करण्याची पूर्ण तयारी केली असून भारतीय बाजारपेठेत लवकरच उतरण्याची घोषणा केली आहे. सरकारने काही दिवसांपूर्वीच ई-वाहन धोरणात सुधारणा केली आहे. या धोरणानुसार 50 कोटी डॉलरहून अधिक गुंतवणूक करणाऱ्या ई-वाहन उत्पादक कंपन्यांना आयात शुल्कात सूट दिली जाईल. त्यामुळे टेस्ला भारतीय बाजारपेठेत जोरदार एन्ट्री घेण्याच्या तयारीत आहे.
मराठी बातम्या/मनी/
Tesla Hiring in India: एलन मस्कची मोठी घोषणा, टेस्लाची भारतातील पहिली भरती मुंबईत, कसा अर्ज कराल?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement