RTO च्या नावाने येणाऱ्या मेसेजवर क्लिक करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, बँक खातं होईल रिकामं

Last Updated:

सावधान! आरटीओच्या नावाने तुमच्या मोबाईलवर 'ही' लिंक आलीय का? क्लिक कराल तर बँक खाते होईल साफ!

News18
News18
मुंबई: जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ई-चलन भरण्यासाठी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स अपडेट करण्यासाठी एखादी लिंक किंवा मेसेज आला असेल, तर थांबा! घाईघाईत त्यावर क्लिक करणे तुम्हाला महागात पडू शकते. आरटीओच्या नावाने बनावट वेबसाईट आणि अ‍ॅप्स पाठवून नागरिकांची आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चंद्रपूरचे आरटीओ किरण मोरे यांनी या संदर्भात वाहनधारकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
सायबर चोरटे सध्या आरटीओच्या अधिकृत सेवांसारख्या दिसणाऱ्या बनावट लिंक व्हॉट्सअ‍ॅप किंवा एसएमएसद्वारे पाठवत आहेत. या लिंकवर क्लिक करताच एक अ‍ॅप डाऊनलोड होते. एकदा का तुम्ही या अ‍ॅपला परवानगी दिली, की तुमच्या मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ आणि बँकेचा सर्व डेटा हॅकर्सच्या हातात जातो. अनेकांना तर पैसे कट झाल्याचा मेसेज आल्यावरच आपली फसवणूक झाल्याचे समजते.
advertisement
ओळखा कशी खरी आणि खोटी वेबसाईट?
लक्षात ठेवा, कोणत्याही सरकारी वेबसाईटच्या शेवटी '.gov.in' असणे अनिवार्य आहे. खरी वेबसाईट: .gov.in या साइटवर जा. om, .online, .site किंवा .in ने संपणाऱ्या लिंक्स या कदाचित फेक लिंक असू शकतात. हॅकर्स अनेकदा खालील नावांच्या फाईल्स पाठवतात, ज्या डाऊनलोड करणे धोक्याचे आहे. RTO Services.apk, mParivahan Update.apk, eChallan Pay.apk या फाइल्सवर क्लिक करा. कोणत्याही संशयास्पद PDF किंवा ZIP फाईल्सवर क्लिक करू नका. परिवहन विभाग कधीही व्हॉट्सअ‍ॅपवर पेमेंट करण्यासाठी कोणतीही लिंक पाठवत नाही.
advertisement
कोणत्या वेबसाईटला भेट द्याल
गाडीच्या कागदपत्रांसाठी vahan.parivahan.gov.in या वेबसाइटला भेट द्या. लाईसन्सच्या कामासाठी sarathi.parivahan.gov.in या वेबसाइटला भेट द्या. ई-चलन भरण्यासाठी echallan.parivahan.gov.in या वेबसाईटला भेट द्या. जर तुमची किंवा ओळखीच्या कोणाची फसवणूक झाली, तर वेळ न घालवता १९३० या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर फोन करा किंवा www.cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. "तुमच्या मोबाईलवर आलेली प्रत्येक लिंक आरटीओची नसते. अधिकृत कामासाठी फक्त सरकारी पोर्टलचाच वापर करा," असे आवाहन आरटीओ कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
RTO च्या नावाने येणाऱ्या मेसेजवर क्लिक करण्यापूर्वी 100 वेळा विचार करा, बँक खातं होईल रिकामं
Next Article
advertisement
Akola News: मशिदीबाहेरच सपासप वार, काँग्रेसच्या बड्या नेत्याला संपवलं, हादरवणारं कारणं आलं समोर, अकोल्यात खळबळ
मशिदीबाहेरच सपासप वार, काँग्रेसच्या बड्या नेत्याला संपवलं, हादरवणारं कारणं आलं स
  • हिदायत पटेल यांच्यावर काल दुपारी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला

  • या हल्ल्यात पटेल गंभीर जखमी झाले, त्यांच्यावर अकोट येथील खासगी रुग्णालयात उपचार

  • मात्र आज पहाटे त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्याचं कारणही समोर आलं आहे.

View All
advertisement