24 तासांत 3000 रुपयांनी वाढले चांदीचे दर, एक तोळे सोन्यासाठी किती मोजावे लागणार पैसे?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
जळगावमध्ये सोन्याचे दर 1 लाख 12 हजारवर तर चांदीचे दर 1 लाख 33 हजार 500 रुपयांवर पोहोचले. पितृपक्षात दरात मोठी वाढ, पुढील काळात आणखी वाढण्याची शक्यता.
जळगाव, प्रतिनिधी नितीन नांदुरकर: पितृपक्षातही सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर 1 लाख 12 हजारवर पोहोचले आहेत. तर चांदीचे दर 24 तासांत 3000 रुपयांनी वाढले आहेत. जळगावमध्ये चांदीच्या दरात 3 हजार रुपयांनी वाढ झाली. ही दरवाढ रोजच सुरूच असून एकाच दिवसात चांदीच्या भावात तीन हजार रुपयांची वाढ झाली. यामुळे चांदीचा दर एक लाख 33 हजार 500 रुपयांवर पोहचला आहे.
सोन्याच्या भावात 500 रुपयांची वाढ होऊन ते एक लाख 10 हजार 500 रुपयांवर पोहचले. 11 सप्टेंबरपर्यंत सोन्याने एक लाख 10 हजार रुपयांचा टप्पा गाठला. तर चांदीही सव्वा लाखाच्या पुढे जाऊन 11 सप्टेंबर रोजी एक लाख 26 हजार 500 रुपयांवर पोहचली. त्यानंतर 12 सप्टेंबर रोजी तर चांदीच्या भावात एकाच दिवसात तीन हजार रुपयांची वाढ झाली, त्यासाठी एक लाख 29 हजार 500 रुपये प्रति किलोवर पोहचली. आज एक किलो चांदीसाठी आता एक लाख 33 हजार 385 रुपये मोजावे लागणार आहे.
advertisement
येत्या काळात सोन्याचे दर 1 लाख 20 हजार रुपयांच्या आसपास तर चांदीचे दर एक लाख 55 हजार रुपयांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे. यावर्षी 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत 24 कॅरेट सोन्याचा दर 76 हजार 162 रुपयांवरून तब्बल 32 हजार 935 रुपयांनी म्हणजेच 43.24 टक्क्यांनी वाढून 1 लाख 9 हजार 97 रुपयांवर पोहोचला आहे. त्याचप्रमाणे चांदीचा दर 86 हजार 17 रुपयांवरून 38 हजार 482 रुपयांनी म्हणजेच तब्बल 44.73 टक्क्यांनी वाढून 1 लाख 24 हजार 499 रुपयांवर पोहोचला आहे.
advertisement
GST वगळून काय आहेत सोन्याचे दर
24 कॅरेट 1 तोळा - 113120 रुपये
23 कॅरेट 1 तोळा- 108406 रुपये
22 कॅरेट 1 तोळा- 103692 रुपये
20 कॅरेट 1 तोळा- 94267 रुपये
18 कॅरेट 1 तोळा- 84840 रुपये
चांदीचे दर प्रति किलो - 130573, GST सह- 132295 रुपये प्रति किलो
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
September 13, 2025 2:28 PM IST
मराठी बातम्या/मनी/
24 तासांत 3000 रुपयांनी वाढले चांदीचे दर, एक तोळे सोन्यासाठी किती मोजावे लागणार पैसे?