Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात चीनचा धमाका, अमेरिकेचा होणार गेम, भारतात सोनं किती महागणार?

Last Updated:

Gold Price: जगाचा सोन्याच्या बाजारात चीननं मोठा धमाका केला आहे. चीननं मोठा डाव खेळला असून अमेरिकेवर स्ट्राइक होणार असल्याची चर्चा आहे.

सोन्याच्या बाजारात चीनचा धमाका, अमेरिकेचा होणार गेम, भारतात सोनं किती महागणार?
सोन्याच्या बाजारात चीनचा धमाका, अमेरिकेचा होणार गेम, भारतात सोनं किती महागणार?
Gold Price Prediction: जगाचा सोन्याच्या बाजारात चीननं मोठा धमाका केला आहे. चीननं मोठा डाव खेळला असून अमेरिकेवर स्ट्राइक होणार असल्याची चर्चा आहे. दोन बड्या देशांमध्ये सुरू असलेल्या या लढाईचा परिणाम भारताच्या सराफा बाजारावर होणार असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
गोल्ड मार्केटमध्ये सध्या चीनने एकच खळबळ उडवून दिली आहे. सोन्याचे भाव ऐतिहासिक उच्चांकावर असतानाही चीन ज्या वेगाने सोन्याची खरेदी करत आहे, ते पाहून जगातील बडे अर्थतज्ज्ञ थक्क झाले आहेत. हा केवळ योगायोग नसून अमेरिकन डॉलरचे वर्चस्व संपवण्यासाठी चीनने आखलेली एक मोठी जागतिक रणनीती असल्याचे बोलले जात आहे.

चीनचा 'मास्टर प्लॅन' काय?

advertisement
चीनची मध्यवर्ती बँक म्हणजेच 'पीपल्स बँक ऑफ चायना'ने (PBOC) सोन्याच्या बाबतीत अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. चीन गेल्या सलग १४ महिन्यांपासून आपल्या साठ्यात सोन्याची भर घालत आहे.

किती सोनं जमवलं?

गेल्या महिन्यातच चीनने ३०,००० ट्रॉय औंस सोने खरेदी केले. नोव्हेंबर २०२४ पासून सुरू झालेल्या या चक्रात चीनने आतापर्यंत सुमारे १३.५ लाख औंस म्हणजेच तब्बल ४२ टन सोने जमा केले असल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement

डॉलरविरुद्ध 'गोल्ड'न अस्त्र!

जेव्हा सोन्याचे भाव गगनाला भिडलेले असतात, तेव्हा सहसा खरेदी मंदावते. मात्र, चीन उलटी चाल खेळत आहे. याचे मुख्य कारण 'डी-डॉलरलायझेशन' असल्याचे सांगितले जात आहे. चीनला जागतिक व्यापारात अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करायचे आहे. जेव्हा जेव्हा जागतिक स्तरावर अनिश्चितता निर्माण होते, तेव्हा डॉलरला पर्याय म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. आपला परकीय चलन साठा डॉलरऐवजी सोन्यात सुरक्षित ठेवण्याचा चीनचा हा मोठा डाव असल्याची हे संकेत आहेत.
advertisement

सोनं खरेदीचे आकडे लपवले जात आहेत?

प्रसिद्ध गुंतवणूक बँक 'गोल्डमन सॅक्स' यांनी म्हटले की, चीनची खरी सुवर्णखरेदी अधिकृत आकडेवारीपेक्षा कित्येक पटीने जास्त असू शकते. चीन जेवढे आकडे जगाला दाखवत आहे, त्यापेक्षा कितीतरी मोठा सोन्याचा साठा तो गुप्तपणे करत असल्याचे संकेत मिळत आहेत. जर हे खरे असेल, तर सोन्याचे भाव नजीकच्या काळात खाली येण्याची शक्यता धूसर असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
advertisement

भारतीय गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?

चीनच्या या 'गोल्ड हंगर'चा थेट परिणाम भारतावर होणार आहे. चीनसारख्या मोठ्या देशाकडून सतत खरेदी होत असल्यामुळे सोन्याच्या भावाला जागतिक स्तरावर भक्कम पाठबळ मिळत आहे. यामुळे भारतात सोन्याचे दर कमी होण्याऐवजी वाढतच राहतील.
जागतिक घडामोडी अशाच राहिल्या तर येत्या काही काळात सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम २ लाख रुपयांच्या दिशेने कूच करू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भाव वाढत असल्याने भारतीय गुंतवणूकदारांसाठी सोने हा अजूनही सर्वात सुरक्षित आणि फायदेशीर पर्याय ठरत आहे.
advertisement
(Disclaimer: ही बातमी वाचकांच्या माहितीसाठी आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आर्थिक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. )
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात चीनचा धमाका, अमेरिकेचा होणार गेम, भारतात सोनं किती महागणार?
Next Article
advertisement
Akot News: शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
शिवसेना ते भाजप व्हाया काँग्रेस, एमआयएमसोबत युती करणारे आमदार भारसाखळे आहेत कोण?
  • भाजप आणि एमआयएम (AIMIM) यांची युती झाल्याने संपूर्ण देशात चर्चा

  • अकोटचे आमदार प्रकाश भारसाखळे यांना 'कारण दाखवा' नोटीस बजावली आहे.

  • भाजपची राजकीय अडचण करणारे प्रकाश भारखळे आहेत कोण, असा प्रश्न काहींना पडला आहे.

View All
advertisement