Real Estate : घर घेण्याचे नियम बदलले, आता फ्लॅट बुकिंगच्या वेळी करावं लागणार 'हे' काम, नवीन आदेश जारी
- Published by:Devika Shinde
Last Updated:
पूर्वी, जेव्हा कोणी फ्लॅट घेत असे, तेव्हा स्टॅम्प ड्युटीचं पेमेंट हे फ्लॅटचं पझेशन (कब्जा) मिळाल्यावर केलं जात होतं. पण आता याचे नियम बदलले आहे.
दिेल्ली : घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. अनेक लोक वर्षानुवर्षं बचत करून आपल्या ‘ड्रीम होम’साठी पैसे साठवत असतात. मात्र, जेव्हा वेळ येते फ्लॅट बुकिंगची, तेव्हा अनेकदा घर विकत घेण्याच्या प्रक्रियेतील नियम अचानक बदलतात. ज्यामुळे कधीकधी पुढ जाऊन हे डोकेदुखी होतं. असंच एक मोठं आणि महत्त्वाचं पाऊल ग्रेटर नोएडा प्राधिकरणानं नुकतंच उचललं आहे.
पूर्वी, जेव्हा कोणी फ्लॅट घेत असे, तेव्हा स्टॅम्प ड्युटीचं पेमेंट हे फ्लॅटचं पझेशन (कब्जा) मिळाल्यावर केलं जात होतं. पण आता नव्या नियमानुसार, बुकिंग करतानाच स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे. म्हणजे घराचं स्वप्न पाहणाऱ्या खरेदीदारांना आता आधीच अधिक आर्थिक तयारी करूनच बुकिंग करावी लागेल.
काय आहे नव्या नियमामागचं कारण?
ग्रेटर नोएडा अथॉरिटीच्या म्हणण्यानुसार, अनेक बिल्डर प्रकल्प वेळेत पूर्ण करत नाहीत. काही तर 10 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत पडून आहेत. यामुळं खरेदीदारांचे आर्थिक नुकसान होते आणि वेळेवर घरही मिळत नाही. या समस्येवर उपाय म्हणून आता प्राधिकरणानं एक पाऊल पुढं टाकत, बुकिंगवेळीच रजिस्टर्ड “एग्रीमेंट टू सेल” करणे बंधनकारक केलं आहे.
advertisement
काय आहे नियम?
जेव्हा खरेदीदार फ्लॅटच्या किंमतीपैकी 10% रक्कम भरतो, त्यावेळी त्याचं रजिस्टर्ड “एग्रीमेंट टू सेल” केलं जाईल.
यासाठी प्रॉपर्टीच्या बाजारमूल्यावर आधारित स्टॅम्प ड्युटी द्यावी लागेल (साधारणतः 6% ते 7%).
फ्लॅट पझेशनवेळी केवळ 100 रुपयांच्या स्टॅम्पवर "पजेशन डीड" साइन होईल.
या नव्या धोरणामुळे बिल्डर नाराज आहेत. त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, जर बुकिंगनंतर खरेदीदार फ्लॅट रद्द करतो, तर त्याला स्टॅम्प ड्युटी परत मिळणार का? यावर प्राधिकरणाकडून अद्याप स्पष्टता आलेली नाही. यामुळे भविष्यात कायदेशीर वाद निर्माण होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
advertisement
ही संकल्पना 27 ऑक्टोबर रोजी झालेल्या 136व्या बोर्ड मिटिंगमध्ये मान्य करण्यात आली होती. यामागचं उद्देश असं की बुकिंगवेळीच रजिस्ट्रेशन करून फ्लॅट दुसऱ्याला विकला जाऊ नये आणि सरकारलाही स्टॅम्प ड्युटीचं उत्पन्न वेळेत मिळावं.
थोडक्यात सांगायचं झालं, तर आता ग्रेटर नोएडा मध्ये घर घ्यायचं असेल, तर बुकिंगच्या वेळीच मोठी रक्कम खर्च करावी लागणार आहे. त्यामुळे घर घेणाऱ्यांनी या नव्या नियमानुसार योजना आखणं गरजेचं ठरेल.
advertisement
हा नियम अजून तरी ग्रेटर नोएडामध्ये लागू करण्यात आला आहे. पण महाराष्ट्रात याबद्दल काहीच हालचाल सध्या तरी नाहीच.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 25, 2025 6:45 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Real Estate : घर घेण्याचे नियम बदलले, आता फ्लॅट बुकिंगच्या वेळी करावं लागणार 'हे' काम, नवीन आदेश जारी