GST वाढीनंतर एक सिगारेट कितीला मिळणार? किंमत ऐकाल तर नक्कीच बसेल धक्का
- Published by:Devika Shinde
Last Updated:
या निर्णयामुळे तंबाखू आणि त्यासंबंधित उत्पादनांवरील कराचा भार आता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
मुंबई : नवीन समोर आलेल्या GST 2.0 मध्ये सरकारने नुकताच असा निर्णय घेतला आहे की आरोग्यास हानिकारक आणि विलासी वस्तूंवर अधिक कर लावला जाईल. ज्यामुळ त्याचा वापर कमी व्हावा आणि त्याच वेळी महसूलही वाढावा. या निर्णयामुळे तंबाखू आणि त्यासंबंधित उत्पादनांवरील कराचा भार आता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
सध्या तंबाखू उत्पादनांवर 28% कर लागू आहे, जो आता वाढवून 40% करण्यात आला आहे. या वाढीचा परिणाम सिगारेट, पान मसाला, सिगार, बनवलेला तंबाखू (पाने वगळून) आणि पुन्हा तयार केलेले तंबाखू उत्पादन यांच्यावर होणार आहे. इतकेच नाही, तर धूम्रपान पाईप, सिगारेट होल्डर आणि त्यांचे सुटे भाग यांनाही या वाढलेल्या दराचा फटका बसणार आहे.
advertisement
सिगारेटच्या किंमतीत किती वाढ होणार?
आधी 19 रुपयांची असलेली सामान्य सिगारेट 28% जीएसटी अंतर्गत विकली जात होती. कर वाढून 40% झाल्यामुळे तीच सिगारेट आता साधारण 21.70 रुपये इतकी होईल. म्हणजेच एक सिगारेट ओढणाऱ्याला प्रति सिगारेट जवळपास 2 रुपये जास्त मोजावे लागतील.
त्याचप्रमाणे, 10 रुपयांची लहान सिगारेट आता साधारण 10.94 रुपये होईल. सुरुवातीला ही वाढ लहान वाटली तरी, महिन्याच्या शेवटी हा भार जास्त जाणवू शकतो.
advertisement
ही वाढ कधीपासून लागू होणार?
सिगारेटवरील वाढीव कराची अंतिम तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही, कारण जीएसटी परिषदेला अजूनही क्षतिपूर्ती उपकराशी संबंधित कर्ज आणि व्याजाची परतफेड करायची आहे. मात्र इतर तंबाखू उत्पादने आणि संबंधित वस्तूंवर ही वाढ 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होईल.
इतर कोणत्या वस्तूंवर परिणाम?
ही वाढ केवळ तंबाखू उत्पादनांपुरती मर्यादित नाही. साखरयुक्त आणि कार्बोनेटेड पेये, कॅफीनयुक्त पेये, लक्झरी कार, 350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या मोटारसायकली, आग्नेयास्त्रे आणि खाजगी विमाने यांवरही 40% जीएसटी लागू होणार आहे. इतकेच नव्हे, तर सट्टेबाजी, कॅसिनो आणि ऑनलाइन गेमिंग यांनाही या कर दराखाली आणले गेले आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 04, 2025 6:45 PM IST