Poultry Farming: उच्चशिक्षित असून सोडला नोकरीचा नाद, गावी येऊन सुरू केला व्यवसाय, तरुणाची कमाई 1 कोटी
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Poultry Farming: उच्च शिक्षित असलेल्या अतिशने नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे.
सोलापूर : आजकाल अनेक तरुणांना 10 ते 5 नोकरी करण्यात रस वाटत नाही. काही उच्च शिक्षित तरुणांनी तर गावाकडे जाऊन शेती करण्यास आणि शेतीशी संबंधित व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यात राहणारा अतिश काळे याचा देखील अशाच तरुणांमध्ये समावेश होतो. उच्च शिक्षित असलेल्या अतिशने नोकरीच्या मागे न धावता स्वतःचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. विशेष म्हणजे त्या इकॉनॉमिक्स विषयामध्ये मास्टर केलेलं आहे. कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून तो वर्षाला 80 लाख ते 1 कोटी रुपयांची उलाढाल करतो.
अतिश लक्ष्मण काळे हा तरुण इतर अनेक तरुणांप्रमाणे शिक्षणासाठी पुण्याला गेला होता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या शोधात न फिरतो तो गावाकडे परत आला. त्याने गावात स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा निर्णय घेतला. मात्र, व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक भांडवल कसं उभं करायचं? हा प्रश्न अतिशपुढे होता. यासाठी त्याचे वडील आणि मामांनी त्याला मदत केली. त्याने वडील आणि मामांच्या आर्थिक पाठबळाच्या मदतीने कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. एक शेड आणि 5 हजार कोंबड्यांसाठी त्याला जवळपास 15 लाख रुपयांपर्यंत खर्च आला.
advertisement
कुक्कुटपालन करण्यासाठी अतिशने 'कावेरी' जातीच्या कोंबड्यांची निवड केली. कावेरी जातीची एक कोंबडी व्यापारी 180 ते 200 रुपयांपर्यंत खरेदी करतात. हा पक्षी मोठा होण्यासाठी 70 ते 90 दिवसांचा कालावधी लागतो. पक्षाच्या वयानुसार तीन टप्प्यात त्याच्या खाद्याचं नियोजन केलं जातं. कावेरी कोंबडीचा वापर मास विक्रीसाठी होतो. या कोंबड्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागत नाही आणि त्यांचा देखभाल खर्च देखील जास्त नाही. या व्यवसायातून अतिश काळे वर्षाला 80 लाख रुपयांची उलाढाल करत आहेत.
advertisement
अतिश म्हणाला, "गावाकडे यात्रा-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या कालावधीत कोंबड्यांना जास्त मागणी असते. सीझनमध्ये एका कोंबडीची 220 ते 250 रुपये प्रति किलो या दराने विक्री केली जाते. माझ्याकडे सध्या कोंबड्यांचे दोन शेड आहेत. एका वर्षातून विक्रीसाठी तीन ते चार बॅच निघतात. सध्या या व्यवसायातून 80 लाख ते 1 कोटी रुपयांची उलाढाल होत आहे."
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Aug 24, 2025 12:40 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Poultry Farming: उच्चशिक्षित असून सोडला नोकरीचा नाद, गावी येऊन सुरू केला व्यवसाय, तरुणाची कमाई 1 कोटी









