Panipuri Business Ideas: संध्याकाळी सुरू आणि रात्री पैसे हातात! पाणीपुरी व्यवसायाचा सक्सेस मंत्र, VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
नवतरुणांनी या व्यवसायात स्थिर होण्यासाठी आणि चांगली कमाई करण्यासाठी काय नियोजन करायला हवे? जाणून घ्या.
छत्रपती संभाजीनगर : येथील रवी तेली यांनी सुरुवातीच्या काळात भेळ आणि पाणीपुरीच्या सेंटरवर दुसरीकडे काम केले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने शिक्षण पूर्ण झाले नाही. त्यामुळे भेळपुरी सेंटरचे काम आपण करू शकतो, असे त्यांना वाटले आणि गेल्या 22 वर्षांपासून पाणीपुरी आणि भेळपुरीचा व्यवसाय अविरत सुरू असून आजही या ठिकाणी दूरवरून तसेच खडकेश्वर परिसरातील नागरिक येथे भेळ आणि पाणीपुरीचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. नवतरुणांनी या व्यवसायात स्थिर होण्यासाठी आणि चांगली कमाई करण्यासाठी काय नियोजन करायला हवे? याबद्दल तेली यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊ.
नवउद्योजकांसाठी महत्त्वाचे म्हणजे व्यवसायाकडे वळावे, भेळपुरी आणि पाणीपुरी सेंटरचे साहित्य हे बाजारातून किंवा मोंढ्यातून रेडिमेड घेऊ शकतात. बाजारात पुरी, मुरमुरे, शेव आणि सर्व लागणाऱ्या वस्तू तसेच पदार्थ मिळतात, कमी पैशात हा सुरू होणारा व्यवसाय आहे.
advertisement
घरी सर्व पदार्थ तयार केले तर यामध्ये 20 टक्के जास्त नफा मिळू शकतो. व्यवसायाची सुरुवात करायची आहे तर कमी बजेटमध्ये बाजारातून सर्व रेडिमेड साहित्य आणून देखील भेळपुरी सेंटर चालवता येते. या व्यवसायातून तरुणांना चांगला रोजगार देखील मिळू शकतो त्यामुळे या क्षेत्रात सर्वांनी यायला हवे असे आवाहन देखील तेली यांनी केले आहे.
advertisement
तेली यांचा यशाचा प्रवास हे दाखवतो की परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द, चिकाटी आणि श्रम यातून यश मिळू शकते, पाणीपुरी-भेळपुरी विकणे ही काही लाज वाटावी अशी गोष्ट नाही, तर गरजूंना रोजगार देणारा आणि कमाईचे स्थिर साधन बनवणारा मार्ग आहे. या व्यवसायात वेळेचे तसेच चवीचे मोठे महत्त्व आहे. वेळच्या वेळी सेंटर उघडणे, स्वच्छता ठेवणं, आणि ग्राहकांशी नीट वागणे या गोष्टी जर सांभाळल्या, तर ग्राहक तुमच्याकडे परत परत येतात.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
August 02, 2025 10:34 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Panipuri Business Ideas: संध्याकाळी सुरू आणि रात्री पैसे हातात! पाणीपुरी व्यवसायाचा सक्सेस मंत्र, VIDEO