भारतात येण्याआधी मस्कसह टेस्लावर घोटाळ्याचा संशय, मिळाली 375 कोटींची सबसिडी; पाहा काय केलं?

Last Updated:

Tesla Subsidy Scam: अमेरिका आणि कॅनडामधील टॅरिफ युद्धात टेस्लाच्या विक्रीत संशयास्पद वाढ झाल्याने चौकशी सुरू झाली आहे. EV सबसिडी बंद होण्याआधीच केवळ 3 दिवसांत 8600 कार विकल्या गेल्या, ज्यातून 375 कोटी रुपयांची सबसिडी मिळाली.

News18
News18
नवी दिल्ली: अमेरिका आणि कॅनडामधील टॅरिफ युद्धात एलन मस्क यांच्या टेस्ला कंपनीवर संशयाचे ढग निर्माण झाले आहेत. EV सबसिडी बंद होण्याच्या काही दिवस आधी कॅनडामध्ये टेस्लाच्या गाड्यांची विक्री झपाट्याने वाढली, ज्यामुळे सरकारने चौकशी सुरू केली आहे.
3 दिवसांत 8600 कार विक्री, 375 कोटींची सबसिडी
मोटर इलस्ट्रेटेडच्या अहवालानुसार कॅनडामध्ये जानेवारी महिन्यात इलेक्ट्रिक व्हेईकल (EV) सबसिडी बंद होण्याआधीच टेस्लाने केवळ तीन दिवसांत 8600 हून अधिक कार विकल्या. या विक्रीतून कंपनीला तब्बल 375 कोटी रुपयांची सबसिडी मिळाली. टोरोंटोमधील एका शोरूममध्ये 11 जानेवारीला एका दिवसात 1200 कार विकल्या गेल्या आणि या शोरूमला 4 दशलक्ष डॉलर्स (33 कोटी रुपये) सबसिडी मिळाली.
advertisement
सरकारी चौकशी सुरू
EV सबसिडी बंद होण्याच्या 72 तास आधी सरकारने संकेत दिले होते. यानंतरच टेस्लाच्या विक्रीत अचानक वाढ झाली. त्यामुळे कॅनेडियन ऑटोमोबाईल डीलर्स असोसिएशनने सरकारकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सरकार टेस्लाच्या विक्रीचा डेटा तपासत असून, या घडामोडीत कोणतीही अनियमितता झाली का, हे शोधत आहे.
advertisement
युरोप आणि ऑस्ट्रेलियात टेस्लाच्या विक्रीत मोठी घसरण झाली आहे. तर दुसरीकडे, युरोप आणि ऑस्ट्रेलियामध्ये टेस्लाच्या विक्रीत मोठी घट झाली आहे.
जर्मनी – 76% घसरण
नेदरलँड – 24% घसरण
स्वीडन – 42% घसरण
फ्रान्स – 45% घसरण
इटली – 55% घसरण
स्पेन – 10% घसरण
ऑस्ट्रेलिया – 66% घसरण
चीनमध्ये उत्पादित टेस्ला कारची विक्री 49% घटली
advertisement
भारतामध्ये टेस्लाची एन्ट्री लवकरच
टेस्ला भारतात लवकरच प्रवेश करणार आहे. कंपनी मुंबईत शोरूम उघडणार असून, त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. भारतात भरती प्रक्रियाही सुरू झाली आहे. मात्र, अमेरिका आणि भारतातील आयात शुल्कासंदर्भातील चर्चेवर अजूनही अंतिम तोडगा निघालेला नाही. अमेरिका भारताकडून EV गाड्यांवरील आयात कर शून्य करावा अशी मागणी करत आहे, पण भारत सरकार अद्याप या निर्णयावर पोहोचलेले नाही.
मराठी बातम्या/मनी/
भारतात येण्याआधी मस्कसह टेस्लावर घोटाळ्याचा संशय, मिळाली 375 कोटींची सबसिडी; पाहा काय केलं?
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement