Ind vs Pak: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर देशभरात भीतीचं वातावरण! IOCL नं सांगितलं खरं कारण…

Last Updated:

भारत-पाकिस्तान तणावामुळे पेट्रोल पंपांवर गर्दी झाली. IOCL ने आश्वस्त केलं की इंधनाची कमतरता नाही. नागरिकांनी घाबरून खरेदी करू नये, असं आवाहन केलं आहे.

News18
News18
नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात काही ठिकाणी पेट्रोल पंपांवर रांगा लागल्याचे पाहायला मिळाले आहेत. पेट्रोल, CNG मिळणार नाही असे Whatsapp मेसेज फिरायला लागले, आणि त्यामुळे भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं. कोणताही विचार न करता लोक पोस्ट फॉरवर्ड करायला लागले. पेट्रोल पंपावर त्यामुळे मोठी गर्दी होऊ लागली. मात्र या पार्श्वभूमीवर इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने नागरिकांना आश्वस्त करत स्पष्ट केलं आहे की देशात पेट्रोल आणि डिझेल यासह कोणत्याही इंधनाची कमतरता नाही.
IOCL ने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं की, “देशभरात आमच्याकडे इंधनाचा भरपूर साठा आहे आणि आमची सप्लाय लाइन पूर्णपणे सुरळीत आहे. नागरिकांनी घाबरण्याचं काहीही कारण नाही. घाबरून खरेदी करू नका.” 'ऑपरेशन सिंदूर'नंतर देशात निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये पुरवठा संपेल यांची भीती निर्माण झाली आहे.
advertisement
भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) नऊ ठिकाणी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर सीमारेषेवर गोळीबार वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये इंधन साठवण्यासाठी गर्दी होत आहे. IOCLने स्पष्ट केलं की सर्व आउटलेट्सवर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी उपलब्ध आहे. “कृपया शांत राहा आणि गरजेपेक्षा जास्त खरेदी टाळा. अनावश्यक गर्दी केल्याने वितरण व्यवस्था बिघडू शकते आणि इतरांना अडचण निर्माण होऊ शकते,” असं आवाहन कंपनीने केलं आहे.
advertisement
हिंदुस्तान टाईम्सच्या माहितीनुसार, पंजाबमधील एका पेट्रोल पंप विक्रेत्याने सांगितलं की गेल्या दोन दिवसांत त्यांच्या विक्रीत तीनपट वाढ झाली आहे. “लोक भयभीत आहेत आणि इंधनासोबतच राशन साठवण्याकडेही वळले आहेत,” असं त्यांनी म्हटलं.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Ind vs Pak: 'ऑपरेशन सिंदूर' नंतर देशभरात भीतीचं वातावरण! IOCL नं सांगितलं खरं कारण…
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement