गरिबांसाठी चालतं फिरतं ATM, 6 लाखांचा नफा, तुम्हालाही होऊ शकतो मोठा फायदा?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
एक तरुण शेतकरी विक्की सुद्धा शेतीसोबत आता शेळीपालन करतात. मात्र, प्रशिक्षण न मिळाल्याने त्यांना चांगला नफा मिळत नव्हता.
धीरज कुमार, प्रतिनिधी
मधेपुरा : ग्रामीण भागामध्ये शेळीपालन केले जाते. या माध्यमातून पशुपालकाला चांगला फायदा होतो. मात्र, असे असतानाही याला एकप्रकारे व्यावसायिक स्वरुप दिले जात नव्हते. पण आता शेळीपालनातून मोठ्या प्रमाणात फायदा मिळत असल्याचे पाहून लोक याला आता आपल्या एका लहान एटीएम प्रमाणे समजत असून मोठ्या प्रमाणात शेळीपालन केले जात आहे. जेव्हा पशुपालकाला पैशांची गरज असते, तेव्हा तो पटकन बकरी विकून चांगले पैसे मिळवत आहे.
advertisement
बिहार राज्यातील शंकरपुर येथील एक तरुण शेतकरी विक्की सुद्धा शेतीसोबत आता शेळीपालन करतात. मात्र, प्रशिक्षण न मिळाल्याने त्यांना चांगला नफा मिळत नव्हता. यामुळे त्यांनी आत्माच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि शेळीपालन प्रशिक्षण घेतले. याबाबात विक्की यांनी सांगितले की, प्रशिक्षणातून मिळालेल्या माहितीचा त्यांना मोठा फायदा झाला.
यामध्ये त्यांना शेळ्यांची देखभाल आणि चारा व्यवस्थापनापासून शेळी गर्भधारणेपर्यंतची माहिती त्यांना यामध्ये देण्यात आली. विक्कीजवळ आता वेगवेगळ्या प्रकारच्या 60 शेळ्या आहेत. शेळीपालनासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गटात दोन ते पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जात आहे. इच्छुक पशुपालक आत्मा कार्यालयाशी संपर्क साधून प्रशिक्षण घेऊ शकतात, असे ते म्हणाले.
advertisement
6 लाखांचा फायदा -
view commentsविक्की गेल्या 10 वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर शेळीपालन करत होते. मात्र, त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार त्यांना नफा मिळत नव्हता. पण आता त्यांनी प्रशिक्षण घेतल्याने ते पूर्वीपेक्षा चांगले व्यवस्थापन करत आहेत. सध्या त्यांच्याकडे ब्लॅक बंगाल, देसी, मुर्राह आणि सिरोही जातीच्या 60 शेळ्या आहेत. यावेळी त्यांना पाच ते सहा लाख रुपयांचा नफा अपेक्षित आहे. जर सर्व काही सुरळीत झाले तर यावर्षी त्याच्या शेळ्यांची संख्या 60 वरून 100 पर्यंत वाढेल. तसेच भविष्यात 500 शेळ्यांपर्यंत वाढवण्याची त्यांची योजना आहे, असे त्यांनी सांगितले.
Location :
Madhepura,Bihar
First Published :
February 07, 2024 3:13 PM IST


