10 वी पास विद्यार्थ्यांसाठी खास सरकारी स्कीम!ट्रेनिंगसह मिळेल 5 हजार रुपये महिना, कधी करावा अर्ज?
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
सरकारने सर्वसाधारण अर्थसंकल्पात या योजनेचे आश्वासन दिले होते. याअंतर्गत तरुणांना टॉप 100 कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार असून त्यांना भत्ताही दिला जाणार आहे.
नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी तरुणांसाठी चांगली संधी चालून आली आहे. कारण, आता त्यांना देशातील 100 मोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे या सरकारी प्रोग्राममधील विद्यार्थ्यांना भत्ताही दिला जाणार आहे. यंदाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात सरकारने भारतातील तरुणांना टॉप भारतीय कंपन्यांमध्ये इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. या सरकारी कार्यक्रमात 111 हून अधिक कंपन्यांनी इंटरेस्ट दाखवला आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, एचडीएफसी बँक, ओएनजीसी, इन्फोसिस, एनटीपीसी, टाटा स्टील, आयटीसी, इंडियन ऑइल, आयसीआयसीआय बँक, विप्रो, महिंद्रा अँड महिंद्रा, एचयूएल, जेएसडब्ल्यू स्टील यासारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. अधिकृत सूत्रांनुसार, या योजनेत सरकारी नोकऱ्यांप्रमाणे SC/ST आणि OBC साठी 50% आरक्षण असेल.
ही तारीख लक्षात ठेवा
सूत्रांनी सांगितले की, या कंपन्यांनी मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (MCA) पोर्टलवर एकूण 1,077 ऑफर केल्या आहेत, ज्या 12 ऑक्टोबर रोजी अर्जांसाठी लाइव्ह होतील. निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण 2 डिसेंबरपासून सुरू होणार असून प्रशिक्षण कालावधी 12 महिन्यांचा असेल.
advertisement
पात्रता अटी
जे विद्यार्थी ग्रेड 10 आणि त्याच्याही पुढे उत्तीर्ण झाले आणि 21-24 वर्ष वयोगटात आहेत. ते अटी आणि शर्ती लक्षात घेऊन अर्ज करण्यास पात्र आहेत. IIT, IIM, NLU मधील पदवीधर आणि CA, CMA, MBBS, BDS आणि MBA सारखी योग्यता असलेले पात्र नाहीत.
या प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांना दरमहा 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार असून त्यापैकी 4,500 रुपये सरकार आणि 500 रुपये कंपनी आपल्या CSR फंडातून देणार आहेत.
advertisement
सरकारचा उद्देश काय?
view commentsआर्थिक वर्ष 2025 मध्ये 1,25,000 तरुणांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे आणि यामध्ये 800 कोटी रुपयांचा आर्थिक खर्च समाविष्ट आहे. या योजनेअंतर्गत पाच वर्षांच्या कालावधीत एक कोटी तरुणांना मोठ्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 04, 2024 1:21 PM IST
मराठी बातम्या/मनी/
10 वी पास विद्यार्थ्यांसाठी खास सरकारी स्कीम!ट्रेनिंगसह मिळेल 5 हजार रुपये महिना, कधी करावा अर्ज?


