आता 31 डिसेंबरचीच आशा! महाराष्ट्रात फॉरेन लिकरच्या किंमती वाढल्यानंतर काय झालं? आकडेवारी वाचून बसेल धक्का
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Fall In Liquor Sales: महाराष्ट्रात परकीय आणि देशी दारूच्या किंमती वाढल्यानंतर विक्रीत ऐतिहासिक घसरण झाली आहे आणि महसुलात तब्बल हजारो कोटींची तूट निर्माण झाली आहे. महागाई आणि वाढते खर्च यामुळे लोकांनी दारूवरील खर्चाला आता ‘लक्झरी’ मानत कपात केली आहे.
मुंबई: महाराष्ट्रात परकीय मद्याच्या (फॉरेन लिकर) किंमतींमध्ये झालेल्या वाढीनंतर विक्रीत मोठी घसरण झाली आहे आणि त्याचा थेट परिणाम राज्याच्या उत्पादन शुल्क महसुलावर झाला आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार सप्टेंबरपर्यंत फक्त 15.1 कोटी लिटर परकीय मद्य विकले गेले, तर गेल्या वर्षी याच कालावधीत 32.19 कोटी लिटर विक्री झाली होती.
advertisement
विक्रीत ऐतिहासिक घसरण
गेल्या काही आर्थिक वर्षांतील आकडेवारीनुसार 2024-25 मध्ये संपूर्ण आर्थिक वर्षात 30 कोटी लिटर, 2023-24 मध्ये 27.72 कोटी लिटर आणि 2022-23 मध्ये 22.52 कोटी लिटर विक्री झाली होती. विशेष म्हणजे करोनाच्या काळात परकीय मद्य विक्रीत उलट वाढ झाली होती.
advertisement
2018-19 आणि 2019-20 या आर्थिक वर्षांत विक्री अनुक्रमे 20.77 कोटी लिटर आणि 21 कोटी लिटर इतकी झाली होती. तर महामारीपूर्व वर्ष 2017-18 मध्ये ती फक्त 17.93 कोटी लिटर इतकी होती.
advertisement
देशी दारूवरही परिणाम
फक्त परकीय मद्यच नव्हे तर देशी दारूच्या विक्रीवरही किंमतवाढीचा परिणाम झाला आहे. जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत फक्त 21.09 कोटी लिटर देशी दारू विकली गेली, तर मागील वर्षी याच काळात ती 40.35 कोटी लिटर इतकी होती. म्हणजेच विक्रीत जवळपास निम्म्याने घट झाली आहे.
advertisement
महसुलात कोसळलेले आकडे
या विक्रीतील मोठ्या घसरणीचा राज्याच्या उत्पादन शुल्क महसुलावर थेट परिणाम झाला आहे. सप्टेंबरपर्यंत महसूल फक्त 12,332 कोटी इतकाच जमा झाला, तर मागील वर्षी याच कालावधीत तो 25,467 कोटी इतका होता.
किंमतवाढ हेच कारण नाही
advertisement
राज्य उत्पादन शुल्क विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मान्य केले की परकीय मद्याच्या विक्रीत मोठी घट झाली आहे. पण त्यामागे केवळ किंमतवाढच कारण नाही. वाढत्या महागाईमुळे लोकांनी आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली असून, मद्य हे त्यातील शेवटच्या प्राधान्यक्रमातील एक घटक ठरले आहे.
advertisement
दारू विशेषतः परकीय दारू ही लोकांसाठी शेवटची प्राथमिकता असते. किंमतवाढीचा उद्देश महसूल वाढवणे आणि इतर राज्यांप्रमाणे दर समायोजित करणे हा होता, पण महाराष्ट्रात हे पाऊल लोकांना पसंत पडलेले नाही. तरीही 31 डिसेंबरसारख्या मोठ्या सणांमुळे महसूलात थोडी भर पडू शकते आणि काही प्रमाणात सकारात्मक चित्र दिसेल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 19, 2025 7:44 PM IST
मराठी बातम्या/मनी/
आता 31 डिसेंबरचीच आशा! महाराष्ट्रात फॉरेन लिकरच्या किंमती वाढल्यानंतर काय झालं? आकडेवारी वाचून बसेल धक्का