PPF होल्डरसाठी खुशखबर! अर्थमंत्र्यांकडून मोठा दिलासा, खातेधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सरकारच्या अधिसूचनेनुसार, स्मॉल सेव्हिंग्स स्कीम अंतर्गत नॉमिनी बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी घेतले जाणारे ५० रुपये शुल्क आता पूर्णपणे रद्द करण्यात आलं आहे.
मुंबई: जर तुम्ही पब्लिक प्रोव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करत असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी जाहीर केलं की, PPF खात्यात नॉमिनी जोडणे किंवा त्यात बदल करण्यासाठी आता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. सरकारने यासाठी 2 एप्रिल 2025 रोजी अधिसूचना जाहीर करून आवश्यक बदल केले आहेत.
निर्मला सीतारामन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट करत सांगितलं की, अलीकडेच काही वित्तीय संस्थांकडून नॉमिनी डिटेल्स जोडण्यासाठी शुल्क घेतले जात असल्याचं लक्षात आलं आहे. नॉमिनीला मूळ खातेदाराच्या निधीवर कायदेशीर हक्क असतो. त्यामुळे सरकारने 'गव्हर्नमेंट सेव्हिंग्स प्रमोशन जनरल रूल्स 2018' मध्ये सुधारणा करत ही शुल्कप्रणाली रद्द केली आहे.
सरकारच्या अधिसूचनेनुसार, स्मॉल सेव्हिंग्स स्कीम अंतर्गत नॉमिनी बदलण्यासाठी किंवा रद्द करण्यासाठी घेतले जाणारे ५० रुपये शुल्क आता पूर्णपणे रद्द करण्यात आलं आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, नुकतंच मंजूर झालेल्या बँकिंग सुधारणा विधेयक 2025 अंतर्गत, जमा केलेले पैसे, लॉकरमधील मालमत्ता किंवा इतर महत्त्वाच्या वस्तूंसाठी जास्तीत जास्त 4 नॉमिनी नियुक्त करता येणार आहेत.
advertisement
Recently was informed that a fee was being levied by financial institutions for updating/modifying nominee details in PPF accounts.
Necessary changes are now made in the Government Savings Promotion General Rules 2018 via Gazette Notification 02/4/25 to remove any charges on… pic.twitter.com/Hi33SbLN4E
— Nirmala Sitharaman (@nsitharaman) April 3, 2025
advertisement
PPF खात्यात नॉमिनी डिटेल्स कसे अपडेट करावेत?
तुम्ही PPF खात्यातील नॉमिनी डिटेल्स फॉर्म-10 भरून अपडेट करू शकता. ही प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारांनी करता येते. काही बँका जसे की SBI, HDFC आणि ICICI इंटरनेट बँकिंगद्वारे ही सुविधा देतात.
ऑनलाइन नॉमिनी अपडेट करण्याची प्रक्रिया:
तुमच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग पोर्टलवर लॉगिन करा.
advertisement
PPF अकाउंट सेक्शनमध्ये जा.
"Nominee Update" किंवा "Modify Nomination" या पर्यायावर क्लिक करा.
नवीन नॉमिनीची माहिती भरा (नाव, नातं, जन्मतारीख इत्यादी).
OTP किंवा लॉगिन क्रेडेन्शियल्सद्वारे प्रक्रिया प्रमाणीकरण करा.
तुमची रिक्वेस्ट सबमिट करा आणि acknowledgement सेव्ह करून ठेवा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 04, 2025 12:57 PM IST
मराठी बातम्या/मनी/
PPF होल्डरसाठी खुशखबर! अर्थमंत्र्यांकडून मोठा दिलासा, खातेधारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय


