advertisement

मुंबईतील 'या' आलिशान फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना 10 पैसेही द्यावे लागत नाही? मेंटेनन्स तर माफच, उलट सोसायटीच देते वर्षाला लाखो रुपये

Last Updated:

मुंबईसारख्या शहरात पॉश सोसायटीमध्ये राहायचं असेल, तर महिन्याला 10 ते 20 हजार रुपये फक्त सोसायटीच्या देखभालीसाठी मोजावे लागतात. महागाईच्या काळात हा खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लावतो.

फोटो सोर्स : सोशल मीडिया
फोटो सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : मुंबईत स्वतःचं घर असणं हे अनेकांचं स्वप्न असतं. पण एकदा का घर घेतलं की सुरू होतो तो म्हणजे 'मेंटेनन्स'चा (Maintenance) खर्च. मुंबईसारख्या शहरात पॉश सोसायटीमध्ये राहायचं असेल, तर महिन्याला 10 ते 20 हजार रुपये फक्त सोसायटीच्या देखभालीसाठी मोजावे लागतात. महागाईच्या काळात हा खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री लावतो. पण, जर आम्ही तुम्हाला सांगितलं की मुंबईत अशीही एक सोसायटी आहे जिथे राहण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही मेंटेनन्स द्यावा लागत नाही?
इतकंच नाही, तर ही सोसायटी दरवर्षी आपल्या सभासदांना उलट 'बोनस' म्हणून लाखो रुपये वाटते. ऐकायला हे एखाद्या स्वप्नासारखं किंवा फिल्मी कथेसारखं वाटेल, पण दक्षिण मुंबईच्या कुलाबा (Cuffe Parade) भागात हे प्रत्यक्षात घडतंय. या आश्चर्यकारक सोसायटीचं नाव आहे 'जॉली मेकर 1' (Jolly Maker 1).
मेंटेनन्सचं टेन्शन नाही, उलट मिळतो 'नफा'
मुंबईच्या हाय-राईज सोसायट्यांमध्ये साधारणपणे 2 ते 25 रुपये प्रति स्क्वेअर फूट मेंटेनन्स घेतला जातो. पण 'जॉली मेकर 1' मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ही डोकेदुखीच नाही.
advertisement
बिले आणि टॅक्स फ्री: येथील रहिवाशांचे सर्व म्युनिसिपल टॅक्स आणि इतर बिले स्वतः सोसायटीच भरते.
आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये जिथे हजारो रुपये मोजावे लागतात, तिथे या सोसायटीत फ्लॅटच्या आकारानुसार महिन्याला फक्त 1 पैसा प्रति स्क्वेअर फूट असा नाममात्र खर्च येतो.
सोसायटीकडे इतका पैसा येतो कुठून?
या सोसायटीच्या श्रीमंतीचे रहस्य तिच्या 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट'मध्ये दडलेले आहे. 1970 च्या दशकात जेव्हा जॉली ग्रुपने ही सोसायटी बांधली, तेव्हा त्यांनी एक दूरदृष्टी ठेवली होती.
advertisement
फ्लॅट विकताना प्रत्येक मालकाला नरिमन पॉईंटमधील एका कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये शेअर देण्यात आला होता.
आज त्या कमर्शियल प्रॉपर्टीचं मासिक भाडं तब्बल 50 लाख रुपयांच्या घरात आहे. या अफाट उत्पन्नातून सोसायटीचा खर्च भागवला जातो आणि उरलेला नफा रहिवाशांना लाभांश (Dividend) म्हणून दिला जातो.
लाभांशातून होते लाखो रुपयांची कमाई
येथे राहणाऱ्यांना फक्त फ्री मेंटेनन्सच मिळत नाही, तर दरवर्षी त्यांच्या बँक खात्यात मोठी रक्कम जमा होते. फ्लॅटच्या आकारानुसार हा लाभांश दिला जातो.
advertisement
उदाहरण: 2023 मध्ये एका 2,500 स्क्वेअर फूट फ्लॅटच्या मालकाला 2.5 लाख रुपये लाभांश मिळाला होता. म्हणजे घरात राहूनच तुम्हाला वर्षाला लाखो रुपयांचे एक्स्ट्रा इन्कम मिळते.
केवळ लाभांशच नाही, तर या सोसायटीतील प्रॉपर्टीची व्हॅल्यूही वेगाने वाढत आहे. 2012 मध्ये येथील 21 व्या मजल्यावरील एक फ्लॅट 29 कोटी रुपयांना विकला गेला होता. आज या ठिकाणी फ्लॅटचा दर 75,000 रुपये प्रति स्क्वेअर फूटच्या पुढे आहे. सी-फेसिंग व्ह्यू, अलिशान बंगले आणि स्मार्ट इन्व्हेस्टमेंटमुळे 'जॉली मेकर 1' ही मुंबईतील सर्वात श्रीमंत आणि फायदेशीर सोसायटी मानली जाते.
view comments
मराठी बातम्या/मनी/
मुंबईतील 'या' आलिशान फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांना 10 पैसेही द्यावे लागत नाही? मेंटेनन्स तर माफच, उलट सोसायटीच देते वर्षाला लाखो रुपये
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement