4 मित्र एकत्र आले अन् गोळा केलं 70 लिटर दूध, आज गावातल्या कंपनीचा टर्नओव्हर 90 कोटी!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Milk Business: अवघ्या 70 लिटर दूध संकलनापासून एका गावात कंपनीची सुरुवात झाली. आता 4 वर्षांत नाशिकच्या कंपनीचा टर्नओव्हर 90 कोटींच्या घरात आहे.
कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक: एकीचे बळ असेल तर फळ हमखास मिळते. याचा प्रत्यय नाशिकमधील 4 मित्रांना आला आहे. सिन्नर सारख्या दुष्काळी तालुक्यात 4 मित्रांनी एकत्र येत एक कंपनी स्थापन केली. कोरोना काळात सुरू झालेल्या या दापूर गावच्या कंपनीनं फक्त 4 वर्षांत मोठं यश मिळवलंय. आता ‘हेल्दी फूड्स’ या कंपनीच्या दुधाच्या पदार्थांना देशातूनच नव्हे तर विदेशातून देखील मागणी असून तब्बल 90 कोटी रुपयांचा कंपनीचा टर्नओव्हर आहे. शरद आव्हाड, संदीप आव्हाड, संजय सांगळे व मनोज सांगळे या चौघा मित्रांच्या प्रवासाबद्दल लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
नाशिकमधील दापूर गावच्या चौघा मित्रांनी एकत्र येत गावातच एखाद्या उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. पूर्वापार दुष्काळी गावात रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी आणि शेतकऱ्यांना देखील शेतीपुरक व्यवसायातून पैसा मिळावा, हा त्यांचा हेतू होता. त्यासाठी शरद आव्हाड, संदीप आव्हाड, संजय सांगळे आणि मनोज सांगळे एकत्र आले आणि 2020 मध्ये कोरोना काळातच दापूर गावात ‘हेल्दी फूड्स नावानं कंपनी सुरू केली.
advertisement
70 लिटर दुधापासून सुरुवात
कोरोनाचा काळ असल्याने इतरांप्रमाणे या चौघांना आणि नव्याने स्थापन झालेल्या कंपनीला देखील अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलं. सुरुवातील अवघ्या 70 लिटर दूध संकलनापासून कंपनीची सुरुवात झाली. तरीदेखील योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाच्या माध्यमातून त्यातून कंपनी यशस्वी वाटचाल करत राहील. सध्या कंपनीचे दूध संकलन 60 हजार लिटर इतकं आहे. तर 6500 शेतकऱ्यांकडून हे दूध संकलित केलं जातं. विशेष म्हणजे अवघ्या 4 वर्षांत कंपनीचा टर्नओव्हर 90 कोटी रुपयांपर्यंत गेला आहे.
advertisement
कंपनीचं उत्पादन काय?
जवळपास 6500 शेतकऱ्यांकडून दैनंदिन संकलित केल्या जाणाऱ्या दुधाच्या अनिवार्य असणाऱ्या विविध चाचण्या करून शुद्धता तपासली जाते. पुढे हे दूध सर्व ऑटोमॅटिक असणाऱ्या मशनरींद्वारे प्रोसेस केलं जातं. त्यापासू पॅकेट दूध, दही, ताक, लस्सी, पनीर, श्रीखंड, आम्रखंड व खवा हे दर्जेदार दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात. विशेष म्हणजे ही सर्व प्रक्रिया मानवी स्पर्धाशिवाय पूर्ण होते. अशा दर्जेदार पदार्थांना देशभरातून मागणी आहे. तसेच हेल्दी फूड्स कंपनी आपल्या 'हेल्दी लाइफ' नावाच्या प्रॉडक्टसोबतच देशातील दुग्धक्षेत्रातील नामांकित ब्रँडच्या पदार्थांचे मॅन्युफॅक्चरिंग व पॅकेजिंग देखील करीत आहे.
advertisement
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
हेल्दी फूड्स त्यांच्यासोबत जोडलेल्या शेतकऱ्यांना गोठा व्यवस्थापन, जनावरांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करते. तसेच, गायींची दुग्धक्षमता वाढविण्यासाठी व कमी जनावरांमध्ये जास्त दूध उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली जाते. गोदरेज कंपनीने सुरू केलेल्या 'गायींचे गर्भ प्रत्यारोपण' तंत्रज्ञानासाठी हेल्दी फूड्स व गोदरेज यांच्यात करार झालेला आहे. ज्याच्या लाभ हेल्दी फूड्स सोबत जोडलेल्या अनेक शेतकऱ्यांनी देखील घेतला आहे, असे आव्हाड यांनी सांगितले.
Location :
Nashik,Maharashtra
First Published :
January 29, 2025 7:43 PM IST
मराठी बातम्या/मनी/
4 मित्र एकत्र आले अन् गोळा केलं 70 लिटर दूध, आज गावातल्या कंपनीचा टर्नओव्हर 90 कोटी!