Goldचे 'हे' गुपित ऐकले नसेल; सोने विकू नका, फक्त...; घरबसल्या लाखो कमवा, कमाईचा नवा मार्ग, लगेच जाणून घ्या

Last Updated:

Gold Leasing: सोन्याचे दर ऐतिहासिक उंचीवर असताना, आता पडून असलेल्या सोन्याच्या बारला 'भाड्याने' देऊन वार्षिक 1% ते 7% पर्यंत अतिरिक्त उत्पन्न कमावण्याचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. या 'गोल्ड लीजिंग'मुळे गुंतवणूकदार सोन्याची मालकी कायम ठेवूनही नियमित निष्क्रिय उत्पन्न मिळवत आहेत.

News18
News18
मुंबई: सोन्याचे दर सध्या ऐतिहासिक उंचीवर पोहोचले आहेत आणि याच तेजीच्या काळात 'गोल्ड बार भाड्याने देणे' (Gold Bar Leasing) हा नवा ट्रेंड वेगाने उदयास येत आहे. धनाढ्य गुंतवणूकदार, कौटुंबिक कार्यालये (Family Offices) आणि मोठे फंड्स आता त्यांच्याकडे पडून असलेल्या म्हणजेच वापरात नसलेल्या सोन्याच्या विटांना (Gold Bars) सराफ, शुद्धीकरण करणारे (Refiners) आणि वित्तीय कंपन्यांना लीजवर देऊन वार्षिक 1% ते 7% पर्यंत अतिरिक्त उत्पन्न मिळवत आहेत. सोन्याची विक्री करण्याऐवजी त्याची मालकी कायम ठेवत त्यावर नियमित उत्पन्न मिळवणे अधिक आकर्षक बनल्यामुळे हा ट्रेंड वाढला आहे.
advertisement
गोल्ड लीजिंग म्हणजे काय?
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, 'गोल्ड लीजिंग' म्हणजे गुंतवणूकदार त्यांच्या सोन्याच्या विटा ज्यांचा ते तातडीने वापर करत नाहीत त्या सराफ, रिफायनर्स किंवा आंतरराष्ट्रीय वित्तीय प्लॅटफॉर्म्सना 'उधार' देतात. हे कर्ज काही आठवड्यांपासून ते काही महिन्यांपर्यंत असू शकते.
advertisement
या बदल्यात गुंतवणूकदाराला दरवर्षी 1-2% रिटर्न मिळतो आणि जेव्हा बाजारात सोन्याच्या साठ्याची (Inventory) कमतरता असते, तेव्हा हा दर 6-7% पर्यंत वाढू शकतो. हे 'भाड्याचे उत्पन्न' रोख रक्कम (Cash), सोन्याच्या ग्रॅममध्ये किंवा व्याजाच्या स्वरूपात मिळू शकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, सोन्याचा मालकी हक्क गुंतवणूकदाराकडेच कायम राहतो. ज्यामुळे सोन्याचे भाव वाढल्यास नफा आणि नियमित निष्क्रिय उत्पन्न (Passive Income) वेगळे मिळते.
advertisement
ट्रेंड वाढण्याची कारणे
जगभरातील गोल्ड लीजिंगचे मोठे व्यवहार लंडन ओव्हर-द-काउंटर (London OTC), LBMA आणि COMEX सारख्या प्लॅटफॉर्मवर होतात, जे गोल्ड लेंडिंग आणि लीजिंगचे जागतिक केंद्र आहेत. भारतातही RSBL, Gullak सारखे डिजिटल गोल्ड प्लॅटफॉर्म आणि बँकांची सुवर्ण मुद्रीकरण योजना (Gold Monetisation Scheme - GMS) यांसारख्या योजनांमध्ये गुंतवणूकदार त्यांच्या सोन्याच्या मालमत्तेवर निष्क्रिय रिटर्न मिळवू शकतात. हा ट्रेंड वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे सोने ही पारंपारिकपणे 'उत्पन्न न देणारी मालमत्ता' (Non-Yielding Asset) मानली जात होती. परंतु आता लीजवर देऊन त्यावर 7% पर्यंत कमाई करणे शक्य झाले आहे. दुसरीकडे सराफांना आणि रिफायनर्सना नेहमी सोन्याच्या साठ्याची गरज असते, त्यांना बँक कर्जापेक्षा लीजवरील सोने स्वस्त आणि जलद पर्याय म्हणून उपलब्ध होते.
advertisement
भारतात तेजी आणि सुरक्षितता
भारतात गेल्या काही महिन्यांत लीजिंगचे दर 2-3% वरून अनेकदा 6-7% पर्यंत पोहोचले आहेत. पुरवठ्याची कमतरता (Supply Crunch) आणि सणांदरम्यान सोन्याच्या साठ्याच्या मागणीत झालेली मोठी वाढ हे याचे मुख्य कारण आहे. GMS सारख्या योजनांमुळे आता केवळ धनाढ्यच नव्हे, तर मध्यम गुंतवणूकदारही आपल्या सोन्याच्या मालमत्तेवर निष्क्रिय उत्पन्न मिळवू शकत आहेत.
advertisement
सुरक्षिततेच्या दृष्टीने गोल्ड लीजिंगमध्ये सोने गुंतवणूकदाराच्या नावावरच राहते आणि अनेक प्लॅटफॉर्मवर मजबूत विमा (Insurance) आणि अनुपालन (Compliance) व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे सोने विकण्याऐवजी दीर्घकाळ होल्ड करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा पर्याय अत्यंत फायदेशीर मानला जातो.
advertisement
view comments
मराठी बातम्या/मनी/
Goldचे 'हे' गुपित ऐकले नसेल; सोने विकू नका, फक्त...; घरबसल्या लाखो कमवा, कमाईचा नवा मार्ग, लगेच जाणून घ्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement