रातोरात खात्यात 1,13,55,00,00,000 कोटी! गरीब मुलगा बनला अरबपती, बँक बॅलन्स पाहून बसला शॉक
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
नोएडाच्या 20 वर्षीय दीपकच्या खात्यात अचानक 1,13,55,00,00,000 रुपये जमा झाले. बँकेने आयकर विभागाला माहिती दिली. तपासात ही रक्कम तांत्रिक बिघाडामुळे दिसत असल्याचे आढळले. खाते सील करण्यात आले आहे.
नोएडा: आपल्या खात्यावर रक्कम क्रेडिट झालेली पाहिली की चेहऱ्यावर आनंद येतो. मात्र इथे तर चेहऱ्याचा रंग उडायचाच बाकी होता. मोजता येणार नाही एवढी रक्कम चक्क 20 वर्षीय युवकाच्या अकाउंटवर ट्रान्सफर झाली होती. खासगी बँकेत त्याचं अकाउंट होतं तिथे ही रक्कम ट्रान्सफर झाली होती. ही रक्कम एवढी मोठी होती की ती पाहताच क्षणी सर्वांना धक्का बसला. इतकंच नाही तर बँकेनंही याची तातडीनं माहिती आयकर विभागाला दिली. हा संपूर्ण प्रकार पाहून अधिकारी देखील चक्रावले.
उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा शहराच्या दनकौर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ऊंची दनकौर गावातील 20 वर्षांचा दीपक अचानक चर्चेत आला आहे. कारण, त्याच्या बँक खात्यात रातोरात 1,13,55,00,00,000 रुपये जमा झाल्याचं त्याच्या मोबाईलवर दिसलं आणि त्याची झोपच उडाली. ही रक्कम पाहून दीपक आणि त्याचा संपूर्ण कुटुंब पूर्णपणे चक्रावून गेला. इतकी प्रचंड रक्कम मोबाईलवर पाहून दीपक काही क्षणांसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक बनला. मात्र हे सुख फार काळ टिकलं नाही.
advertisement
आयकर विभागाने त्यांचं अकाउंट सील केलं आहे. ही माहिती समोर येताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीची पाहणी केली. बँक आणि पोलिसांच्या प्राथमिक तपासात लक्षात आले की, ही रक्कम प्रत्यक्षात बँकेच्या सिस्टममध्ये कुठेही नोंदलेली नाही. मात्र दीपकच्या मोबाइल अॅपमध्ये ती रक्कम अजूनही दिसत होती. त्यामुळे हे कुठलेतरी तांत्रिक बिघाड आहे की मोठ्या सायबर फसवणुकीचा भाग, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
advertisement
ग्रेटर नोएडा से शख्स के खाते में आए 1 अरब 13 लाख 55 हजार करोड़ रुपए
36 डिजिट की रकम अकाउंट में हुई ट्रांसफर
#GreaterNoida #UpNews #Breaking pic.twitter.com/cyJfTdsuge
— News18 Uttar Pradesh (@News18UP) August 4, 2025
advertisement
दीपकचे बँक खाते तातडीने सील करण्यात आलं. आयकर विभागाचे अधिकारी आणि पोलीस या प्रकरणी चौकशी करत आहेत. ही रक्कम कशी आली, कुठून ट्रान्सफर झाली आणि यामागे कोण आहे. याचा तपास सुरू आहे. हा प्रकार समोर येताच सोशल मीडियावरही खळबळ उडाली आहे. अनेक जण दीपकला ‘रिअल लाईफ अरबपती’ म्हणत मजेशीर प्रतिक्रिया देत आहेत. इतकी मोठी रक्कम कोणत्याही छोट्या देशाच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही जास्त आहे आणि त्यामुळे प्रशासनही अधिक सतर्क झालं आहे.
Location :
Noida,Gautam Buddha Nagar,Uttar Pradesh
First Published :
August 05, 2025 8:03 AM IST
मराठी बातम्या/मनी/
रातोरात खात्यात 1,13,55,00,00,000 कोटी! गरीब मुलगा बनला अरबपती, बँक बॅलन्स पाहून बसला शॉक