बँकेपेक्षा बेस्ट रिटर्न देतेय पोस्ट ऑफिसची स्कीम, इतक्या रुपयांपासून गुंतवा पैसे

Last Updated:

पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंट फक्त 500 रुपयांत उघडता येतं आणि 4% वार्षिक व्याज मिळतं. सरकारी आणि खासगी बँकांच्या तुलनेत हे अधिक फायदेशीर आहे. 10,000 रुपयांपर्यंत करसवलत मिळते.

News18
News18
नोकरी-व्यवसाय करून सामान्य नागरिक चरितार्थ चालवतो आणि त्यातूनच बचतही करतो. आपले खर्च भागवून उरलेल्या रकमेतून बचत करण्याचा त्याचा प्रयत्न असतो. कधीकधी पैसे हाताशी असावेत म्हणून धड ते गुंतवता येत नाहीत आणि ते पैसे सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये ठेवले तर धड व्याजही मिळत नाही. अनेकांची अशी अवस्था असते. मग माणूस शोधतो असं सेव्हिंग्ज अकाउंट जे त्यातल्यात्यात अधिक व्याज देतं. तुम्हीही अशा बँक खात्याच्या शोधात असाल तर तुमचा शोध ही बातमी वाचून संपू शकतो. पोस्ट ऑफिस डिपार्टमेंट म्हणजे बोली भाषेत टपाल खातं बँकिंग सुविधा देतं आणि खासगी बँकांच्या तुलनेतही अधिक व्याज दर देतं.
फक्त 500 रुपयांत उघडा खातं
पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग्ज अकाउंट उघडण्यासाठी केवळ 500 रुपयांची आवश्यकता असते. कारण 500 रुपये भरून तुम्ही नवं पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज खातं उघडू शकता आणि त्या खात्याचा किमान बॅलन्स तेवढाच असतो. याचा दुसरा फायदा असा असतो की कितीही खर्च झाला तरीही तेवढे 500 रुपये किमान बॅलन्स राखणं तुलनेने सोपं जातं.
advertisement
या अकाउंटबरोबर चेकबुक, एटीएम कार्ड, ई-बँकिंग आणि मोबाईल बँकिंग अशा आधुनिक सुविधा पण मिळतात. तसंच आधार लिंकिंगच्या माध्यमातून तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता. पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंटमधील बाकी रकमेवर 4.0% वार्षिक व्याज दिलं जातं, जे प्रमुख सरकारी आणि खासगी बँकांच्या तुलनेत अधिक आहे.
बँकांच्या तुलनेत उत्तम पर्याय
भारतात सरकारी आणि खासगी बँकांत सेव्हिंग्ज अकाउंट उघडताना किमान बॅलन्ससाठी वेगवेगळ्या अटी-शर्ती असतात. सरकारी बँकांत किमान 1,000 ते 3,000 रुपयांपर्यंत किमान बॅलन्स ठेवावा लागतो तर, खासगी बँकांमध्ये ही किमान रक्कम 5,000 ते 10,000 रुपयांपर्यंत असू शकते. तसंच व्याज दराचा विचार केला तर, सरकारी बँकांत 2.70% आणि खासगी बँकांत 3.00% ते 3.50% पर्यंत वार्षिक व्याज दर मिळतो, जो पोस्ट ऑफिसच्या दरांपेक्षा कमी आहे.
advertisement
प्राप्तीकरात मिळते सवलत
पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंटवर मिळणाऱ्या व्याजाला प्राप्तीकर अधिनियम कलम 80TTA अंतर्गत 10,000 रुपयांपर्यंत करसवलत मिळते. त्याचबरोबर, पोस्ट बँक खातं सरकारतर्फे चालवलं जातं त्यामुळे ते सुरक्षित आहे. पोस्ट ऑफिस सेव्हिंग्ज अकाउंट कोणतीही प्रौढ भारतीय व्यक्ती उघडू शकते. दोघं मिळून जॉईंट अकाउंट काढू शकतात. 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचं खातं उघडता येतं ते त्याचे आईवडिल किंवा पालक हाताळू शकतात. थोडक्यात काय तर कुणीही प्रौढ भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग्ज खातं उघडू शकतो.
view comments
मराठी बातम्या/मनी/
बँकेपेक्षा बेस्ट रिटर्न देतेय पोस्ट ऑफिसची स्कीम, इतक्या रुपयांपासून गुंतवा पैसे
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement