कुत्रा चोरी, जखमी झाला किंवा कोणाला चावला; तरीही मिळेल भरपाई, जाणून घ्या Pet Insurance चे फायदे

Last Updated:

Pet Insurance: कुत्रे मांजरीसाठी एक स्पेशल इन्शुरन्स आहे. जे त्यांना हेल्थ कव्हर प्रदान करते. चला जाणून घेऊया या पॉलिसी संबंधित नियम आणि अटी...

पेट इन्शुरन्स
पेट इन्शुरन्स
Insurance for Pet Animal: जगभरात पाळीव प्राणी घरी आणण्याची लोकांची आवड वाढत चालली आहे. विशेषतः कुत्र्यांना जास्तीत जास्त पाळलं जातं. भारतात डॉग लव्हरर्स झपाट्याने वाढत आहेत. लोकांमध्ये कुत्रे पाळण्याचं एवढं वेड आहे की, आता लोक परदेशी ब्रीडचे महागडे कुत्रे पाळत आहेत. कुत्र्यांच्या खाण्यापिण्यावरही लोक भरपूर पैसा खर्च करतात. याच कारणामुळे इन्शुरन्स कंपनी देखील पेट डॉगसाठी खास इन्शुरन्स घेऊन येतेय.
सामान्यतः हेल्थ इन्शुरन्स हे मानवांसाठी असते. मात्र काही इन्शुरन्स कंपन्या आता पाळीव प्राण्यांसाठी देखील हेल्थ कव्हर ऑफर करतात. चला जाणून घेऊया पेट इन्शुरन्स आणि यावर येणारा प्रीमियम विषयी सविस्तर माहिती...
काय असतं Pet Insurance?
पशू विमा, कुत्रे आणि मांजरीसाठी एक स्पेशल इन्शुरन्स आहे. जे त्यांना हेल्थ कव्हर प्रदान करते. जसं की आपण आपल्या कुटुंबातील लोकांसाठी हेल्थ इन्शुरन्स खरेदी करतो. तसंच पाळीव प्राण्यांसाठी पेट इन्शुरन्स घेतलं जातं. यामध्ये पाळीव प्राण्यांच्या उपचारांवर होणारा मेडिकल खर्च कव्हर केला जातो.
advertisement
Pet Insurance का गरजेचं?
पाळीव प्राण्यांच्या देखरेखीवर दरवर्षी चांगला पैसा खर्च होतो. यामध्ये त्यांना दिल्या जाणाऱ्या लसी आणि इतर मेडिकल खर्चाचा समावेश आहे. एका अंदाजानुसार, अनेक लोक पाळीव डॉगच्या केअरवर 10,000 ते 54,000 रुपये वार्षिक खर्च देतात. अशा वेळी पशू विम्याच्या माध्यमातून तुम्ही हे खर्च कव्हर करु शकतात.
advertisement
Pet Insurance शी संबंधित नियम आणि अटी
भारतात बजाज एलियॉन्ज जनरल इन्शुरन्स, न्यू इंडिया इन्शुरन्स आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पशु विमा ऑफर करताय. यामध्ये इन्शुरन्स पॉलिसीविषयी प्रत्येक कंपनीचे नियम आणि अटी-वेगवेगळ्या आहेत.
पॉलिसी बाजार डॉटकॉमवर उपलब्ध माहितीनुसार, बजाज एलियॉन्ज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या पाळीव पशु विमा पॉलिसीमध्ये कुत्रे किंवा मांजरीच्या प्रवेशाचं वय हे 3 महिन्यांपासून तर 7 वर्षे आहे. तर एग्जिट एज 6 वर्षांपासून तर 10 वर्षे पर्यंत असायला हवे. यासोबतच इतर विमा कंपनीच्या वेगवेगळ्या अटी आहेत.
advertisement
इन्शुरन्समध्ये या खर्चांसाठी मिळेल कव्हर
बजाज एलियॉन्ज जनरल इन्शुरन्सचे कस्टमर सपोर्टसोबत झालेल्या चर्चेच्या आधारावर Pet Insurance मध्ये कुत्र्यांच्या उपजारादरम्यान होणारी सर्जरी, मॉर्टेलिटी बेनिफिट, थर्ड पार्टी लायबिलिटी कव्हर म्हणजे तमच्या डॉगने इतर कोणाला नुकसान पोहोचवले तर त्याची नुकसान भरपाई, कुत्रा हरवला किंवा चोरी गेल्यावरही क्लेम मिळेल. इन्शुरन्स पॉलिसीमध्ये काही कव्हर अनिवार्य रुपात सामिल होतील. तर काही कव्हर जोडले जाऊ शकतात. मात्र यासाठी अतिरिक्त प्रिमियम भरावा लागेल.
मराठी बातम्या/मनी/
कुत्रा चोरी, जखमी झाला किंवा कोणाला चावला; तरीही मिळेल भरपाई, जाणून घ्या Pet Insurance चे फायदे
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement