फक्त व्याजच मिळेल 2.54 लाख आणि लोनही मिळेल, काय आहे Post Office ची ही स्कीम
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. या योजनेत तुम्ही महिन्याला पाच हजार रुपये जमा करून आठ लाख रुपयांपर्यंत निधी उभा करू शकता.
मुंबई: पैशांची बचत करायची असेल तर रिकरिंग डिपॉझिट म्हणजेच आरडी एक चांगला मार्ग आहे. पोस्ट ऑफिस किंवा बँकेत कुठेही आरडी सुरू करता येते. पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये रिकरिंग डिपॉझिट योजना खूप लोकप्रिय आहे. या योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. या योजनेत तुम्ही महिन्याला पाच हजार रुपये जमा करून आठ लाख रुपयांपर्यंत निधी उभा करू शकता.
योजनेचा कालावधी संपल्यावर तुम्हाला तुमचे एकूण जमा केलेले पैसे व्याजासह परत मिळतात. सध्या पोस्ट ऑफिस आरडीवर 6.7 % वार्षिक व्याजदर दिला जात आहे. केंद्र सरकारने 2023मध्ये पोस्ट ऑफिसच्या आरडी योजनेचा व्याज दर वाढवला. या योजनेवर आधी 5.8% व्याज दर मिळायचा तो आता 6.7 टक्के आहे. हे व्याज वार्षिक मिळतं.
कसे जमा होतील आठ लाख रुपये
पोस्ट ऑफिस आरडीमधून आठ लाख रुपये कसे जमा होतील, असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. आरडीमध्ये गुंतवणूक आणि व्याजाचं गणित खूप सोपं आहे. तुम्ही फक्त पाच हजार रुपये महिन्याला जमा करून आठ लाख रुपयांचा निधी उभारू शकता. तुम्ही पोस्ट ऑफिसच्या आरडीमध्ये पाच हजार रुपये दरमहा पाच वर्षांसाठी गुंतवले तर एकूण तीन लाख रुपये जमा होतील. यावर तुम्हाला 6.7 टक्के दराने व्याज मिळेल. तीन लाखांवर मिळणारं व्याज 56,830 रुपये असेल. म्हणजे तुमची गुंतवणूक पाच वर्षांत 3,56,830 रुपये होईल.
advertisement
तुम्हाला ही रक्कम आणखी पाच वर्षांसाठी एक्स्टेंड करावी लागेल. म्हणजे तुमची रक्कम 10 वर्षांत सहा लाख रुपये होईल. त्यावर तुम्हाला 6.7 टक्के दराने 2,54,272 रुपये व्याज मिळेल. या हिशेबाने 10 वर्षांत तुम्हाला एकूण 8,54,272 रुपये मिळतील.
लोन घेता येतं
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीमचा एक फायदा आहे. तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट उघडू शकता. तसंच यात किमान 100 रुपयांपासून गुंतवणूक करता येते. पोस्ट ऑफिस आरडीचा कालावधी पाच वर्षांचा आहे. तुम्ही मॅच्युरिटीआधी अकाउंट क्लोज करू शकता. तसंच या पैशांवर लोन घेण्याची सुविधाही तुम्हाला मिळते. एक वर्ष अकाउंट चालू ठेवल्यावर तुम्ही जमा रकमेपैकी 50 टक्के रक्कम लोन म्हणून घेऊ शकता; पण त्यावर तुम्हाला जो व्याजदर मिळतोय, त्यापेक्षा दोन टक्के जास्त व्याज द्यावं लागतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 30, 2024 3:15 PM IST