तुमच्या यशावर 'जळणाऱ्या' लोकांना कसे ओळखाल? वाचा ५ 'स्मार्ट' टिप्स...
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
मेहनत (Hard work) हीच यशाची गुरुकिल्ली (Key to success) आहे, हे आपण सगळेच जाणतो. पण तुम्ही कमावलेलं यश पाहून प्रत्येक वेळी, प्रत्येक जण...
मेहनत (Hard work) हीच यशाची गुरुकिल्ली (Key to success) आहे, हे आपण सगळेच जाणतो. पण तुम्ही कमावलेलं यश पाहून प्रत्येक वेळी, प्रत्येक जण तितकाच आनंदी (Happy) होईल, याची खात्री देता येत नाही. आजचं युग स्पर्धेचं (Era of competition) आहे. इथे प्रत्येक जण एकमेकांच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात आहे. अशा वेळी, तुमचं यश काहींना आनंद देतं, तर काहींना निराश (Disappoint) करतं.
हे निराश झालेले लोक त्यांचा राग तुमच्या तोंडावर कधीच व्यक्त करत नाहीत. उलट, ते तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल अफवा (Rumors) पसरवून तुमच्या प्रगतीत अडथळा (Hinder your progress) आणण्याचा प्रयत्न करतात.
अशा लोकांना ओळखण्यात झालेली एक छोटीशी चूक (Small carelessness) सुद्धा तुमचं मोठं नुकसान (Great harm) करू शकते. म्हणूनच, अशा लोकांशी कसं वागायचं? चला, ५ महत्त्वाचे उपाय जाणून घेऊया.
advertisement
यशाने जळणाऱ्या लोकांशी 'या' ५ मार्गांनी व्यवहार करा
१. आधी ओळखा, मग प्रतिक्रिया द्या (Identify first, then react): मत्सरी (Jealous) लोकांशी दोन हात करण्याआधी, त्यांना ओळखणं सर्वात महत्त्वाचं आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा: तुमचा खरा शत्रू तोच आहे, जो तुमच्या सुखात दुःखी आणि तुमच्या दुःखात आनंदी होतो.
बऱ्याचदा ही ईर्ष्या खोट्या कौतुका मागे (False compliments) किंवा गरजेपेक्षा जास्त मैत्रीपूर्ण व्यवहारामागे (Friendly transactions) लपलेली असते. अशा लोकांना ओळखण्यासाठी स्वतःला ३ प्रश्न विचारा:
advertisement
या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्यांच्या जाळ्यात न अडकता (Without falling into their trap) पुढची रणनीती ठरवायला मदत करतील.
२. यश 'साजरं' करा, पण 'प्रदर्शन' टाळा (Be patient in showing success): नेहमी लक्षात ठेवा, आपलं यश वेळेआधीच जाहीर (Announce) करणं शहाणपणाचं (Wise) नसतं. तुमच्या योजना (Plans) पूर्णत्वास जाण्यापूर्वी त्या इतरांना सांगू नका. आजकाल लोक आपला छोटासा आनंदही लगेच सोशल मीडियावर पोस्ट करतात. पण अशी अवाजवी प्रसिद्धी (Too much publicity) लोकांच्या मनात नकळत मत्सराची (Envy) भावना निर्माण करू शकते.
advertisement
लक्षात ठेवा, मत्सरी लोक तुमच्या आनंदात आनंदी होण्याऐवजी, तुमच्याविरुद्ध षड्यंत्र (Plot) रचू शकतात. त्यामुळे आपलं यश नेहमी फक्त निवडक आणि विश्वासू (Select trusted) लोकांसोबतच साजरं करा. ध्येय पूर्ण झाल्यावरच त्याबद्दल जगाला सांगा. योजना गुप्त ठेवल्यास तुमचं लक्षही विचलित (Less wandering) होत नाही.
३. रागाने नाही, तर्काने उत्तर द्या (Answer with logic, not emotion): जेव्हा एखादी मत्सरी व्यक्ती उघडपणे तुमची टीका (Criticizes) करते किंवा तुमच्याबद्दल अफवा (Rumor) पसरवते, तेव्हा रागाने प्रतिक्रिया (Reacting in anger) देण्यापेक्षा शांत राहणं हाच तुमचा पहिला विजय असतो.
advertisement
नेहमी लक्षात ठेवा, "राग बुद्धीचा नाश करतो (Anger destroys intelligence)" आणि बुद्धीशिवाय माणूस योग्य-अयोग्य (Right or wrong) यातला फरक करू शकत नाही. त्यामुळे, आधी परिस्थिती शांतपणे समजून (Assess the situation calmly) घ्या. खरंच उत्तर देण्याची गरज आहे का, हे ठरवा. आणि जर उत्तर देणंच भाग असेल, तर ते योग्य तथ्ये (Correct facts) आणि संयमित शब्दांत (Moderate words) द्या. अशाने तुमचा सन्मान (Dignity) टिकून राहतो आणि समोरच्याला तुम्हाला चिथावणं (Provoke) कठीण होऊन बसतं.
advertisement
४. सुरक्षित अंतर ठेवा (Keep your distance): चुकीच्या लोकांपासून (Wrong people) स्वतःचा बचाव (Protect) करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यांच्यापासून दूर राहणे. तुम्ही एखाद्या मत्सरी व्यक्तीची मानसिकता (Mindset) बदलू शकत नाही, हे सत्य स्वीकारा. त्यामुळे, त्यांच्यापासून एक निरोगी अंतर (Healthy distance) राखणं, हेच शहाणपणाचं (Sensible step) ठरतं.
तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात (Personal and professional life) त्यांचा सहभाग मर्यादित (Limit) ठेवा. अशा लोकांसोबत तुमच्या खासगी गोष्टी किंवा भविष्यातील योजना (Sensitive thoughts) कधीही शेअर करू नका.
advertisement
५. फक्त ध्येयावर लक्ष केंद्रित करा (Keep focus on your target): मत्सरी लोकांचा खरा हेतू एकच असतो - तुमचं लक्ष तुमच्या ध्येयावरून विचलित (Distracting you from your goals) करणं. त्यांना माहीत असतं की, एकदा का तुम्ही भरकटलात, की तुमचं यश थांबेल.
नेहमी लक्षात ठेवा, जो व्यक्ती आपल्या कामावर आणि ध्येयावर लक्ष केंद्रित (Concentrates on his goal) करतो, तो आजूबाजूच्या गोंगाटाने (Noise around him) कधीच विचलित होत नाही. तुमची ध्येयं गाठण्यासाठी एक स्पष्ट रोडमॅप (Clear roadmap) तयार करा. अशा लोकांच्या नकारात्मक टीका (Negative comments) ऐकून खचून जाऊ नका, उलट त्या टीकेलाच तुमची प्रेरणा (Fuel your motivation) बनवा आणि अधिक वेगाने पुढे जा.
हे ही वाचा : लिव्हर सिरोसिसला हलक्यात घेऊ नका; या आजाराने होऊ शकतो थेट कॅन्सर, वाचा ४ धोक्याचे टप्पे
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 24, 2025 10:09 AM IST


