निवृत्तीनंतर पैशांचे टेन्शन! Post Officeच्या स्कीममध्ये पैसे गुंतवा, आयुष्यभर दरमहा मिळेल पेन्शन
- Published by:Prachi Amale
Last Updated:
Post Office Pension Scheme for Senior Citizen: काहीजण वृद्धापकाळात नियमित उत्पन्न मिळावं, यासाठी गुंतवणूक करतात. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू नये. याविषयी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे.
Post Office Pension Scheme: नोकरदारांना निवृत्तीनंतर दर महिन्याला उत्पन्न मिळवणं सोपं नाही. यामुळेच अनेकजण नोकरीच्या काळात विविध योजनांमध्ये पैसे गुंतवत असतात. जेणेकरून निवृत्तीनंतर पैशाची चणचण भासू नये. आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जिथे तुम्ही एक रकमी गुंतवणूक करून मासिक उत्पन्न मिळवू शकता. ही एक सरकारी योजना आहे.
आजच्या महागाईच्या काळात स्वतःच्या कमाईतील काही रक्कम बचत करून ती योग्य ठिकाणी गुंतवण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. या गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्सही मिळतात. पण काहीजण वृद्धापकाळात नियमित उत्पन्न मिळावं, यासाठी गुंतवणूक करतात. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागू नये. अशी गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिसची ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस) खूप लोकप्रिय आहे. या सरकारी योजनेत 8.2 टक्के दरानं व्याजही मिळते.
advertisement
पाच वर्षांचा मॅच्युरिटी कालावधी
पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूकदाराला पाच वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. मात्र, मॅच्युरिटीपूर्वी अकाउंट बंद केल्यास नियमानुसार दंड भरावा लागतो. तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन या योजनेअंतर्गत अकाउंट उघडू शकता. ही योजना निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यामध्ये 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही व्यक्ती स्वतंत्र किंवा पती-पत्नी संयुक्त अकाउंट उघडू शकतात. या योजनेअंतर्गत काही प्रकरणांमध्ये वयात सवलतही देण्यात आलीय. व्हीआरएस घेणाऱ्या व्यक्तीला या योजनेंतर्गत अकाउंट उघडायचे असेल तर त्याचे वय 55 वर्षांपेक्षा जास्त आणि 60 वर्षांपेक्षा कमी असावे. तसेच भारतीय लष्करी सेवेतून निवृत्त झालेल्या व्यक्तीचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त आणि 60 वर्षांपेक्षा कमी असावे. यासाठी काही निर्बंधही घालण्यात आलेत. या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीला आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंत वार्षिक कर सूट दिली जाते.
advertisement
तर, महिन्याला मिळतील 20 हजार रुपये
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूकदार फक्त 1000 रुपयांनी सुरुवात करू शकतात. तर, जास्तीतजास्त 30 लाख रुपये गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणुकीची रक्कम 1000 रुपयांच्या पटीत ठरवली जाते. तुम्हाला जर या योजनेतून 20,000 रुपये मासिक उत्पन्न हवं असेल, तर त्यासाठी तुम्हाला या योजनेत सुमारे 30 लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल. ज्यावर तुम्हाला 8.2 टक्के व्याजानं वार्षिक 2.46 लाख म्हणजेच महिन्याला सुमारे 20,000 रुपये उत्पन्न मिळेल. या योजनेत दर तीन महिन्यांनी व्याज दिलं जातं. एप्रिल, जुलै, ऑक्टोबर आणि जानेवारी महिन्याच्या एक तारखेला गुंतवणूकदाराला व्याज दिलं जातं. मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्यापूर्वी गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास अकाउंट बंद करून त्यातील रक्कम वारसदाराला दिली जाते.
advertisement
पोस्ट ऑफिसमध्ये प्रत्येक वयोगटासाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये बचत योजना चालवल्या जातात. ज्यामध्ये सरकारकडून केवळ सुरक्षित गुंतवणुकीची हमी दिली जात नाही, तर अनेक बँकांमध्ये एफडीच्या व्याजदरापेक्षा व्याजदर जास्त आहे. ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्न मिळावे, यासाठीही पोस्ट ऑफिसमध्ये योजना उपलब्ध आहेत. ज्येष्ठ नागरिक बचत योजना ही अशीच एक खास योजना आहे. या योजनेतून चांगले रिटर्न मिळत असल्यामुळे ती खूपच लोकप्रिय होत आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 25, 2024 10:02 PM IST
मराठी बातम्या/मनी/
निवृत्तीनंतर पैशांचे टेन्शन! Post Officeच्या स्कीममध्ये पैसे गुंतवा, आयुष्यभर दरमहा मिळेल पेन्शन