Success Story : नोकरीला केला रामराम, 2 मित्रमैत्रिणीने सुरू केला यशस्वी फूड ब्रँड, महिन्याची कमाई तर पाहा

Last Updated:

अनेक तरुण नोकरीसोडून व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. प्रणाली पाटील आणि तन्मय मोरे या दोन मित्रमैत्रिणींनी आपल्या जिद्दीच्या जोरावर टीपी मॅगी पॉईंट नावाचे फूड आउटलेट सुरू करून यशाची नवी ओळख निर्माण केली आहे.

+
भांडुपमधील

भांडुपमधील दोन मित्रमैत्रिणींनी सुरू केला एक यशस्वी फ़ूड ब्रँड!

मुंबई : अनेक तरुण नोकरीसोडून व्यवसाय करण्याला प्राधान्य देत आहेत. भांडुपमधील प्रणाली पाटील आणि तन्मय मोरे या दोन मित्रमैत्रिणींनी आपल्या जिद्दीच्या जोरावर टीपी मॅगी पॉईंट नावाचे फूड आउटलेट सुरू करून यशाची नवी ओळख निर्माण केली आहे. प्रणालीने नोकरीचा सुरक्षित मार्ग सोडून व्यवसायात उडी घेतली. घरच्यांनी सुरुवातीला विरोध केला, परंतु प्रणालीने आणि तन्मयने निर्धाराने हा व्यवसाय सुरू केला आणि आज त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना दुप्पट परत मिळत आहे.
टीपी मॅगी पॉईंट मध्ये मॅगी, पास्ता, कोल्ड कॉफी अशा आकर्षक पदार्थांची चव ग्राहकांना मिळते. विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ प्रणाली स्वतः बनवते आणि तन्मय ग्राहकांना स्वतः सर्व्ह करतो. त्यांच्या दोघांची मेहनत आणि ग्राहकांशी असलेला आपुलकीचा संवाद हेच त्यांच्या यशाचे गमक ठरले आहे. आज ते या व्यवसायातून महिन्याला नोकरी करून जितके मिळत होते त्याच्या डबल ते कमवत आहेत. महिन्याला प्रत्येकी 60 हजार कमाई ते करतात.
advertisement
तन्मय सांगतो, आम्ही दोघेही मिडल क्लास मराठी कुटुंबातून आलो आहोत. त्यामुळे व्यवसाय सुरू करताना अनेक नकार आणि अडथळे आले, पण आम्ही हार मानली नाही. प्रयत्न करत राहिलो आणि आज लोकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे.
advertisement
प्रणाली आणि तन्मय यांचा ठाम विश्वास आहे की व्यवसायाचा फक्त विचार करून काही होणार नाही तर कृती करणे गरजेचे आहे. त्यांनी स्वतःसाठी ‘365 डे चॅलेंज’ घेतले आहे, ज्याद्वारे ते दररोज इंस्टाग्रामवर आपल्या प्रवासाची झलक लोकांसमोर मांडतात. या उपक्रमामुळे अनेकांना प्रेरणा मिळत आहे की सातत्य आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश नक्की मिळते.
advertisement
अलीकडेच त्यांच्या इंस्टाग्राम पेजने 1000 फॉलोअर्सचा टप्पा पार केला असून हे त्यांच्यासाठी अभिमानास्पद क्षण ठरले आहे. प्रणाली आणि तन्मय सांगतात, सातत्य आणि मेहनत हे यशाचे दोन आधारस्तंभ आहेत. स्वप्नं बघा, पण ती पूर्ण करण्यासाठी कृती करा, यश तुमच्याही पावलांशी जोडले जाईल.
टीपी मॅगी पॉईंटची ही यशोगाथा तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. जिद्द, सातत्य आणि मेहनत या तीन गोष्टी असतील तर कोणतेही स्वप्न अपुरे राहत नाही.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : नोकरीला केला रामराम, 2 मित्रमैत्रिणीने सुरू केला यशस्वी फूड ब्रँड, महिन्याची कमाई तर पाहा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement