RBI 2000 Note Exchange : तुमच्याकडे अजूनही आहे 2000 ची नोट? मग यापद्धतीने बदलून घ्या पैसे

Last Updated:

सध्या ही नोट बाजारातून आणि चलनातून जवळजवळ नाहीशी झाली आहे. पण मग असं असेल तर एखाद्याजवळ ही नोट राहिली किंवा ती नोट असेल तर त्याचं आता काय होणार?

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : भारतात नोटाबदल किंवा चलनासंबंधी नियमांमध्ये वेळोवेळी बदल होत असतात. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या नोटा चालू आहेत की नाही, हे वेळोवेळी तपासणं आवश्यक ठरतं. विशेषत: ज्या नोटा बाजारातून काढून घेतल्या जातात, त्या योग्य वेळी बदलल्या नाहीत तर अडचणीत येऊ शकतं. अशाच नोटांमध्ये आहे 2000 रुपयांची नोट.
सध्या ही नोट बाजारातून आणि चलनातून जवळजवळ नाहीशी झाली आहे. पण मग असं असेल तर एखाद्याजवळ ही नोट राहिली किंवा ती नोट असेल तर त्याचं आता काय होणार?
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) वर्ष 2023 मध्ये 2000 रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी या नोटांची बाजारातील एकूण किंमत 3.56 लाख कोटी रुपये इतकी होती. RBI च्या ताज्या अहवालानुसार, आजवर 98.35% नोटा बँकांकडे परत जमा झाल्या असून अजूनही 5884 कोटी रुपयांच्या नोटा बाजारात उरलेल्या आहेत.
advertisement
आता नोटा कुठे बदलता येतील?
जर तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा असतील, तर लक्षात घ्या की आता त्या सामान्य बँकांमध्ये थेट जमा किंवा बदलता येणार नाहीत. कारण RBI ची बँकिंग डेडलाईन 7 ऑक्टोबर 2023 रोजी संपली आहे. मात्र, अजूनही तुम्हाला या नोटा बदलण्याची संधी आहे.
तुम्ही थेट RBI च्या 19 प्रादेशिक कार्यालयांमध्ये नोटा बदलू शकता.
advertisement
अथवा भारतीय टपाल सेवेच्या माध्यमातून नोटा RBI कार्यालयात पाठवून रक्कम आपल्या खात्यात जमा करू शकता.
RBI ने स्पष्ट केलं आहे की 2000 रुपयांची नोट आता सामान्य खरेदी-विक्री किंवा व्यवहारासाठी वैध नाही. मात्र, तिची किंमत संपलेली नाही. कारण ही नोट अजूनही "लीगल टेंडर" आहे. याचा अर्थ असा की, कर्ज फेडणं, थकबाकी चुकती करणं किंवा काही आर्थिक व्यवहार करण्यासाठी या नोटांचा उपयोग होऊ शकतो. मात्र दुकानदार किंवा सामान्य लोक व्यवहारात या नोटा स्वीकारणार नाहीत.
advertisement
जर तुमच्याकडे अजूनही 2000 रुपयांच्या नोटा असतील, तर योग्य निर्णय म्हणजे त्या लवकरात लवकर RBI च्या अधिकृत कार्यालयात बदलून घेणं. वेळ न घालवता या नोटा बदलून घेतल्यास तुमचं चलन सुरक्षित राहील आणि अनावश्यक अडचणी टाळता येतील.
मराठी बातम्या/मनी/
RBI 2000 Note Exchange : तुमच्याकडे अजूनही आहे 2000 ची नोट? मग यापद्धतीने बदलून घ्या पैसे
Next Article
advertisement
Superstar Fathers Flop Sons: सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
    View All
    advertisement