Post Office Scheme: बायको टॅक्स वाचवणार आणि बक्कळ कमाईही देणार, पोस्टाची योजना, 1 एप्रिलला शेवटचा मुहूर्त

Last Updated:

MSSC Post Office Scheme: महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) योजना महिलांसाठी 7.5% वार्षिक व्याज देते. 31 मार्चपूर्वी गुंतवणूक करून 80C अंतर्गत टॅक्स सूट मिळवता येते. खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.

Post Office Scheme: बायको टॅक्स वाचवणार आणि बक्कळ कमाईही देणार, पोस्टाची योजना, 1 एप्रिलला शेवटचा मुहूर्त
Post Office Scheme: बायको टॅक्स वाचवणार आणि बक्कळ कमाईही देणार, पोस्टाची योजना, 1 एप्रिलला शेवटचा मुहूर्त
मुंबई: टॅक्स वाचवण्यासाठी तुम्ही जर उत्तम पर्याय शोधत असाल तर तुम्ही बायकोच्या नावाने पैसे ठेवा. विश्वास बसणार नाही पण त्यावर मिळणाऱ्या इंटरेस्ट रेटवर तुम्हाला 80C अंतर्गत सूट घेता येणार आहे. तुमची बायको तुम्हाला टॅक्सपासून वाचवू शकते. ते करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 2 महिन्यांची मुदत शिल्लक आहे. जर तुम्ही 1 एप्रिलआधी हे काम केलं नाही तर मात्र तुमच्या खात्यावरुन टॅक्सचे पैसे कापले जाऊ शकतात. ही योजना कोणती आहे आणि टॅक्समधून कसा फायदा मिळतो जाणून घेऊया सविस्तर.
जर तुम्ही अशा FD किंवा डिपॉझिट योजना शोधत असाल जिथे तुमचे पैसे जास्त काळ लॉक होणार नाहीत आणि चांगला परतावा मिळेल, तर पोस्ट ऑफिसच्या महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (Mahila Samman Savings Certificate - MSSC) ही योजना तुमच्यासाठी योग्य आहे. पत्नी, बहिण, आई किंवा मुलीच्या नावाने गुंतवणूक करून तुम्ही दोन वर्षांत दुप्पट नफा मिळवू शकता.
advertisement

MSSC योजना नेमकी काय आहे?

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना ही सरकारने महिला बचत प्रोत्साहनासाठी सुरू केली आहे. या योजनेत 7.5% वार्षिक व्याज दिले जाते, जे दोन वर्षांच्या एफडीवर सहज उपलब्ध नसते. यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

किती रुपये गुंतवणूक?

  • 2,00,000 रुपये गुंतवून : दोन वर्षांत व्याजासह 2,32,044 रुपये मिळतील.
  • 1,50,000 रुपये गुंतवून : दोन वर्षांत 1,74,033 रुपये मिळतील.
  • 1,00,000 रुपये गुंतवून : दोन वर्षांत 1,16,022 रुपये मिळतील.
  • 50,000 रुपये गुंतवून: दोन वर्षांत 58,011 रुपये मिळतील.
advertisement

कधीपर्यंत करता येणार गुंतवणूक?

गुंतवणूक करण्यासाठी 31 मार्च ही अंतिम तारीख आहे. यामुळे 1 एप्रिलपूर्वीच गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे.

MSSC खातं कसं उघडाल?

महिला सन्मान योजना सुरू करण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी पोस्टात खातं उघडावं लागेल. हे तुम्हाला ऑफलाईन जवळच्या शाखेत जाऊन काम करावं लागेल. त्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक आहेत ते पाहुया.
advertisement
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रंगीत छायाचित्र

पैसे काढण्याची अट काय?

वयाच्या कोणत्याही बंधनाशिवाय महिला किंवा मुलगी या योजनेत सहभागी होऊ शकतात. अल्पवयीन मुलीच्या खात्यासाठी पालक किंवा गार्डियन यांना खाते उघडता येते. महिला सन्मान योजना 2 वर्षांत मॅच्युअर होते. 1 वर्षानंतर 40% पर्यंत रक्कम काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. उदाहरणार्थ, 2 लाख रुपये गुंतवले असतील, तर 1 वर्षानंतर 80,000 रुपये काढता येतात.
advertisement

टॅक्समध्येही मिळणार सूट

या योजनेतून मिळालेल्या इंटरेस्ट रेटवर ४० हजार रुपयांपर्यंत सूट एका आर्थिक वर्षात सरकारकडून दिली जाते. मात्र यासाठी तुम्ही जुने टॅक्स रिजीम निवडलेलं असायला हवं. नव्या टॅक्स रिजीममध्ये मात्र यासाठी कोणतीही सूट मिळत नाही. सीनियर सिटीझन्सना एका आर्थिक वर्षात 50 हजार रुपयांपर्यंत ही सूट दिली जाते. जुन्या टॅक्स रिजीमनुसार 80C अंतर्गत तुम्ही टॅक्समधून सूट घेऊ शकता.
मराठी बातम्या/मनी/
Post Office Scheme: बायको टॅक्स वाचवणार आणि बक्कळ कमाईही देणार, पोस्टाची योजना, 1 एप्रिलला शेवटचा मुहूर्त
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement