बायकोच्या नावावर जमा करा 2 लाख रुपये! मिळेल 32 हजारांचं गॅरंटीड व्याज, स्किम कोणती?

Last Updated:

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेअंतर्गत तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करू शकत नाही.

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट
Best saving schemes for Women: केंद्र सरकार देशातील विविध विभागांसाठी अनेक प्रकारच्या बचत योजना चालवत आहे. या सीरीजमध्ये केंद्र सरकार महिलांसाठी काही खास योजनाही राबवत आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून भरघोस व्याज मिळू शकते. तुम्ही विवाहित असाल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेऊ शकता. होय, आम्ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र (MSSC) बद्दल बोलत आहोत. पीएम नरेंद्र मोदी यांच्या सरकारने 2023 साली ही योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत फक्त महिलांचेच अकाउंट उघडता येते.
तुम्ही मिनिमम 1000 रुपये आणि मॅक्सिमम 2 लाख जमा करू शकता
एमएसएससीला 7.5 टक्के व्याज मिळत आहे. या योजनेंतर्गत तुम्ही किमान 1000 रुपये आणि कमाल 2 लाख रुपये जमा करू शकता. ही स्किम 2 वर्षात पूर्ण होते. तसंच, तुम्ही अकाउंट उघडण्याच्या तारखेपासून 1 वर्षानंतर पात्र बॅलेन्सचं 40 टक्के रक्कम काढू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही तुमच्या पत्नीच्या नावावर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र अकाउंट कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये उघडू शकता.
advertisement
2 लाख रुपये जमा करा आणि 32,000 रुपयांचे गॅरंटेड व्याज मिळवा
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत तुम्ही 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करू शकत नाही. तुम्ही 2 लाख रुपये देखील जमा केल्यास तुम्हाला या रकमेवर 7.5 टक्के व्याज मिळेल. यानुसार तुमच्या पत्नीला मॅच्युरिटीवर एकूण 2,32,044.00 रुपये मिळतील. म्हणजे तुमच्या पत्नीला 2 लाख रुपयांच्या ठेवीवर एकूण 32,044 रुपये व्याज मिळेल.
advertisement
मुलगी किंवा आईच्या नावाने अकाउंट उघडता येते
तुम्ही अद्याप विवाहित नसल्यास, तुम्ही तुमच्या आईच्या नावाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेतही गुंतवणूक करू शकता.
view comments
मराठी बातम्या/मनी/
बायकोच्या नावावर जमा करा 2 लाख रुपये! मिळेल 32 हजारांचं गॅरंटीड व्याज, स्किम कोणती?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement