Akshaye Khanna: डोकी कापून फुटबॉल खेळणारा रहमान डकैत होता कोण? अक्षय खन्नाने कसा साकारला क्रूर जल्लाद

Last Updated:
Dhurandhar Akshaye Khanna As Rehman Dakait: ‘धुरंधर’मध्ये अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैत प्रेक्षकांना अक्षरशः थरथरवतो आहे. कराचीच्या गल्लीगल्ल्यांत दहशत पसरवणाऱ्या या कुख्यात गँगस्टरची रक्तरंजित कहाणी चित्रपटात भीषणपणे जिवंत झाली आहे.
1/7
‘धुरंधर’ चित्रपट एकीकडे बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई करत आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर अक्षय खन्ना आपल्या रहमान डकैत या भूमिकेमुळे तुफान ट्रेंड होत आहे. अक्षय खन्नाने साकारलेला हा खतरनाक गँगस्टर प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणतो. ज्याच्या दहशतीने कधी लोक थरथर कापत असत, त्याच्या कारनाम्यांची आठवणही लोकांना हादरवून टाकणारी. चित्रपटात अक्षय खन्नाचा अभिनय इतका प्रभावी आहे की इतर सर्व कलाकारांवर तो भारी पडताना दिसतो.

advertisement
2/7
जरी ‘धुरंधर’मध्ये लीड रोल रणवीर सिंगने साकारला असला, तरी सगळी वाहवाही अक्षय खन्ना लुटून नेतो आहे. या  थ्रिलरमध्ये तो रहमान बलोच उर्फ रहमान डकैतची भूमिका साकारतो. तो चित्रपटातील मुख्य खलनायक आहे. त्याच्या अभिनयाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा आहे. अनेकांच्या मते खरा रहमान डकैत चित्रपटातील दाखवलेल्यापेक्षा कितीतरी पटींनी अधिक भयानक होता.

3/7
निर्देशक आदित्य धर यांची ही फिल्म वास्तवातील घटनांवर आधारित आहे. भारत–पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी ऑपरेशन्सवर आधारलेल्या या कथानकाची पार्श्वभूमी 2000 च्या दशकाच्या शेवटच्या काळातील कराचीच्या लियारी भागाची आहे. जो गँग युद्ध आणि गुन्हेगारीसाठी कुप्रसिद्ध. अक्षय खन्ना रहमानची भूमिका करताना दिसतो, जो आपल्या चुलत भावासह म्हणजेच उजैर बलोचसोबत लियारीवर राज्य गाजवत होता.

4/7
रणवीर सिंगने साकारलेला हमजा हा एक भारतीय गुप्तहेर आहे. तो रहमानच्या गँगमध्ये घुसखोरी करून त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचबरोबर ISI आणि गुन्हेगारी नेटवर्कमधील संबंधांची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांना पुरवतो.

5/7
रहमान डकैतचे खरे नाव सरदार अब्दुल रहमान बलोच होते. पाकिस्तानचा हा कुख्यात गुंड 2000 च्या दशकात लियारीमध्ये दहशत पसरवत होता. 1975 मध्ये जन्मलेल्या रहमानने किशोरवयातच ड्रग्जची विक्री सुरू केली. फक्त 13 व्या वर्षी एका व्यक्तीला चाकू मारत त्याने पहिल्यांदा खून करण्याचा प्रयत्न केला. एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार, 19 वर्षांचा असताना त्याने स्वतःच्या आईचा गळा दाबून खून केला आणि तिचे शव पंख्याला टांगून आत्महत्येसारखे भासवले. थोड्याफार क्रिएटिव बदलांसह ‘धुरंधर’मध्येही हा प्रसंग दाखवला आहे.

6/7
90 च्या दशकाच्या शेवटी रहमानने हाजी लालू गँगमध्ये प्रवेश केला. 2001 मध्ये हाजी लालूला अटक झाल्यानंतर रहमानने संपूर्ण गँगची सूत्रे हातात घेतली. पुढील आठ वर्षे लियारीमध्ये त्याचे पूर्ण वर्चस्व होते. उजैर बलोच आणि बाबा लाडला हे त्याचे सर्वात विश्वासू साथीदार होते. डेली गार्डियनच्या अहवालानुसार, रहमानच्या आदेशावर लाडला व इतर साथीदार त्यांच्या शत्रूंचे कापलेले डोके फुटबॉलसारखे खेळत, ताकद दाखवण्यासाठी असा भयानक प्रयोग करीत.

7/7
रहमान डकैतचा शेवट ऑगस्ट 2009 मध्ये कराची पोलिसांसोबतच्या चकमकीत झाला. सरकारने लियारीतील गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई सुरू केली तेव्हा त्याचे वय फक्त 34 वर्षे होते. रहमानच्या मृत्यूनंतर त्याचा चुलत भाऊ उजैर बलोचने संपूर्ण गँगची सूत्रे हाती घेतली.

Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाल
  • ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली सिक्रेट बैठक, क

View All
advertisement