मित्राच्या लग्नासाठी स्वीडनहून मुंबईला आलेल्या तरुणाचा मृत्यू, नशेत गेटवरून उडी मारली अन्...
- Published by:Prachi Amale
Last Updated:
सोसायटीतील रहिवाशांनी हा संपूर्ण प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये टिपला असून ते दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
विश्वनाथ सावंत, प्रतिनिधी
नवी मुंबई : सानपाड्यात स्वीडनच्या एका 30 वर्षीय तरुणाचा इमारतीवरून खाली पडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मृत युवकाचं नाव Allde Edvard Jan असून तो आपल्या इंडोनेशियातील एका मित्रासोबत नवी मुंबईतल्या प्रणय या मित्राच्या लग्न समारंभासाठी आला होता.
माहितीनुसार, रात्री दीडच्या सुमारास वाशीतील रघुलीला मॉलमध्ये झालेल्या लग्नसोहळ्यातून Allde हा अबोट हॉटेलमध्ये जात होता. मात्र, रस्ता चुकणे आणि जास्त प्रमाणात मद्यपान यामुळे तो सानपाडा सेक्टर–1 मधील साईराज सोसायटीत पोहोचला. इमारतीचा गेट बंद असल्याने त्याने ते चढून आत प्रवेश केला आणि थेट चौथ्या मजल्यावर गेला. तिथे तो चुकीच्या ठिकाणी आल्याची जाणीव झाल्यानंतर खाली जिना शोधण्याऐवजी त्याने बाल्कनीतून उतरण्याचा प्रयत्न केला, पण संतुलन सुटून तो खाली कोसळला. पाय आणि खांद्यास गंभीर दुखापत झाली आणि तो रक्तबंबाळ अवस्थेत विव्हळत पडलेला दिसला.
advertisement
व्हिडीओ सोशल मीडियावर
याच इमारतीत राहणारे वृत्तपत्राचे संपादक संजय मलमे यांनी आवाज ऐकून तातडीने पोलिसांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यांची मुलगी श्रुती मलमे हिने तरुणाशी संवाद साधून त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. यावेळी जखमी तरुण मी ठीक आहे , थोडासा मार लागलाय असं म्हणताना दिसतंय . सोसायटीतील रहिवाशांनी हा संपूर्ण प्रसंग आपल्या मोबाईलमध्ये टिपला असून ते दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
advertisement
काय आहे स्थानिकांचा आरोप?
संजय मलमे यांनीदेखील या संदर्भात पोस्ट करत पोलिस आणि आरोग्य यंत्रणेच्या कामकाजातील उणीव, विलंब आणि निष्काळजीपणा याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक रहिवाशांचा आरोप केला आहे की, काही अंतरावर पोलीस ठाणे असतानाही पोलिस वेळेवर पोहोचले नाहीत. जखमी अवस्थेत असलेल्या युवकाला जवळच्या खाजगी रुग्णालयात न नेता वाशीच्या मनपा रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर त्याला सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, मात्र तेव्हा त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी वेळेवर प्रतिसाद दिला असता, तर या विदेशी तरुणाचा जीव वाचू शकला असता.
advertisement
वैद्यकीय सेवेच्या प्रतिसादावर गंभीर प्रश्नचिन्ह
सध्या सानपाडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या घटनेमुळे स्थानिक प्रशासन, पोलीस दल आणि वैद्यकीय सेवेच्या प्रतिसादाबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
हे ही वाचा :
view commentsLocation :
Navi Mumbai,Thane,Maharashtra
First Published :
December 08, 2025 9:27 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
मित्राच्या लग्नासाठी स्वीडनहून मुंबईला आलेल्या तरुणाचा मृत्यू, नशेत गेटवरून उडी मारली अन्...


